या जगात अशी अनेक जोडपी आहेत जे काही कारणांमुळे पालक बानू शकत नाहीत. अशावेळी आपला वंश वाढवण्यासाठी ही जोडपी स्पर्म डोनर्सची मदत घेतात. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याने याच विषयावर ‘विक्की डोनर’ या नावाचा चित्रपट केला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला समजलेच असेल की स्पर्म डोनेट केल्याने कशाप्रकारे पालक होता येते.
याच कारणामुळे सध्या ब्रिटनचा एक व्यक्ती चर्चेचा विषय ठरतोय. हा व्यक्ती स्पर्म डोनर आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या व्यक्तीला आतापर्यंत १२९ मुलं झाली असून ९ मुले जन्माला येणार आहेत. याचाच अर्थ ही व्यक्ती या मुलांचा बायोलॉजिकल पिता आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या क्लाइव्ह जोन्स यांचं वय ६६ वर्षे आहे.
Viral Video : दरीत अडकलेल्या ट्रकचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ज्या वयात लोकं निवृत्ती घ्यायचा विचार करतात, अशा वयात जोन्स यांनी स्पर्म डोनेशनचे काम सुरु केले. विशेष म्हणजे ते या कामाचे पैसेही घेत नाहीत. जोन्स मागील १० वर्षांपासून स्पर्म डोनेट करत आहेत. १५० मुलांचा पिता बनण्याची जोन्स यांची इच्छा आहे. त्यानंतर ते हे काम सोडणार आहेत.
द सन वेबसाईटच्या बातमीनुसार, ब्रिटनमध्ये स्पर्म डोनर बनण्याचे जास्तीत जास्त वय ४५ वर्षे आहे. याच कारणाने जोन्स अधिकृतरित्या स्पर्म डोनर बनू शकत नव्हते. त्यामुळेच त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. फेसबुकच्या माध्यमातून ते आपल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतात. जोन्सच्या म्हणण्यानुसार इतरांचा आनंद बघून त्यांना आनंद मिळतो, म्हणून ते कोणाकडूनही या कामासाठी पैसे घेत नाहीत. जोन्स यांनी सागितले, एका वृत्तपत्रातील लेख वाचल्यानंतर त्यांना ही कल्पना सुचली.