संपुर्ण देशभरात होळीचा सण अगदी उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. पण सध्या दोन पायलट्सना होळी साजरा करणं चांगलच महागात पडलं आहे. शिवाय त्यांनी होळी दिवशी विमानात असं काही कृत्य केलं आहे. ज्यामुळे विमान कंपनीकडून त्यांना डि-रोस्टर करण्यात आलं आहे. डि-रोस्टर म्हणजे त्यांना विमान चालवण्याच्या ड्यूटीवरुन काढण्यात आलं आहे. तर त्यांनी नेमकी कशी होळी साजरी केली? ज्यामुळे त्यांना कामावरुन काढण्यात आलं ते जाणून घेऊया.
मागील बुधवारी स्पाईसजेटच्या दोन पायलट्सनी विमान चालवत असताना होळी साजरी केल्याचं उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी कॉकपिटमध्ये फ्लाइट डेकच्या सेंटर कन्सोलवर त्यांनी कॉफीचा ग्लास ठेवले होते. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच दोन्ही वैमानिकांना चौकशी होईपर्यंत त्यांना रोस्टर करण्यात आलं असून कॉकपिटमध्ये खाद्यपदार्थ न वापरण्याच्या कंपनीचे धोरण आहे आणि त्याचे सर्व फ्लाइट क्रू पालन करतात, त्यामुळे या दोन पायलट्सवरती योग्य ती कारवाई केली जाईल, असं स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे कन्सोलवर ठेवलेल्या ग्लासमधील थोडी कॉफी खाली सांडली असती तरी विमानाच्या सुरक्षिततेवर परिणाम झाला असता. हा फोटो व्हायरल होताच अनेकांनी या घटनेचा निषेध करत, पायलट्सनी प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याच प्रयत्न या केला असल्याचं म्हंटलं आहे. एका नेटकऱ्याने, पायलट्सचे हे कृत्य भयावह असल्याचं म्हटलं आहे. शिवाय कॉफीचा एक थेब जरी खाली गळाला असता तरी कॉकपीटमध्ये शॉर्ट सर्किट झाले असते आणि विमानाच्या सुरक्षितपणे उड्डाण करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला असता असं कमेंट बॉक्समध्ये म्हटलं आहे.