SpiceJet Pilot Announce in Rhyming Video Viral: सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. बहुतेक व्हिडिओ असे आहेत की लोक नाचताना दिसतील किंवा लोक कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर भांडताना दिसतील, अशाप्रकारचे व्हिडिओ दररोज इंटरनेटवर व्हायरल होतात. पण तुम्ही असा व्हिडिओ कधी पाहिला आहे का ज्यामध्ये पायलट आपल्या प्रवाशांचे स्वागत करताना दिसत आहे. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्याने लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं?
तुम्ही विमानाने प्रवास केला असेल तर तुम्ही पाहिलं असेल की, विमानात बसताच पायलट किंवा विमानातील क्रू मेंबर्स आधी सर्व प्रवाशांचं स्वागत करतात त्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना देतात. पण शक्यतो त्यांना तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी भाषेत बोलताना पाहिलं असेल. पण कधी काव्यात्मक शैलीत सूचना देताना पाहिलं आहे का, नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विमानातील पायलटने सर्व प्रवाशांचं अनोख्या पध्दतीनं स्वागत केलं. जे पाहून सर्व प्रवाशांना सुरुवातीला धक्का बसला. पण काव्यात्मक शैलीत उड्डाणात घोषणा ऐकून काही प्रवाशांना आनंदही झाला.
(हे ही वाचा : महिला अन् तिच्या दोन मुलांच्या अंगावर घराचे छप्पर कोसळल्याचा VIDEO पाहिलात का? दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ )
दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानात पायलटने शायरीमध्ये अनाऊंसमेंट केली. व्हिडिओमध्ये पायलट सर्व प्रवाशांचे स्वागत करतो आणि म्हणतो, “आम्ही आमचे काम सुरळीतपणे केले तर आपण आता १.२५ तासांत गंतव्यस्थानासाठी निघू. त्यामुळे तुमच्या फुफ्फुसांना थोडी विश्रांती द्या आणि धूम्रपान करू नका अन्यथा त्याचे परिणाम दंडनीय असू शकतात. पुढे ते म्हणतात की, जर आपण उंचीबद्दल बोललो तर ३२ हजार फूट असेल, कारण जर तुम्ही जास्त उंच गेलात तर तुम्हाला कदाचित देवाचे दर्शन होऊ शकते. पायलट आपल्या प्रवाशांचे काव्यात्मक शैलीत स्वागत करताना दिसत आहे ज्याने लोकांची मने जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की तेथे उभे असलेले अनेक लोक रेकॉर्डिंग करत आहेत.
येथे पाहा व्हिडिओ
लोकं काय म्हणाले?
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर @HasnaZaruriHai नावाच्या पेजने शेअर केला आहे. वृत्त लिहेपर्यंत सात हजार लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये ‘एक पायलट ऐसा भी’ आणि ‘पायलटची काव्यात्मक शैली लोकांचे मनोरंजन करते’ असे लिहिले आहे. पायलटची काव्यात्मक शैलीही लोकांना आवडली. एका युजरने ‘Nice’ असे लिहिले तर दुसऱ्या यूजरने इमोजी जोडून त्याचे कौतुक केले.