Python Viral Video: घरात ज्या ठिकाणी साफसफाई केलेली नसते, तिथे कोळी त्याचं जाळं पसरवत असतो. कोळी त्या जाळ्यात राहतो आणि शिकार करण्यासाठीही त्याचा वापर करतो. कोळ्यांना घरात जाळं बनवताना आपण नेहमीच पाहतो. मात्र, एका कोळ्याने पसरवलेल्या जाळ्याचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. कारण हे साधारण जाळ नसून अजगरासारख्या सापाचीही शिकार करेल, अशी या जाळ्याची खासीयत आहे. एक मोठा अजगर कोळ्याच्या जाळ्यात अडकल्यानंतर कोळी त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याची शिकार करतो. हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
कोळ्याच्या जाळ्यात अकडला अजगर
कोळ्याने पसरवलेल्या जाळ्यात अजगर अडकतो आणि त्यानंतर त्याचा तडफडून मृत्यू होतो, असं या व्हिडीओत दिसत आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. व्हिडीओत एक अजगर दिसतोय, सुरुवातीला तो हवेत लटकल्यासरखा दिसतो. पण व्हिडीओला बारकाईने पाहिल्यानंतर तो अजगर कोळ्याच्या जाळ्यात अडकला असल्याचं दिसतं. अजगर त्या जाळ्यातून स्वत:ला सोडवण्याचा आतोनात प्रयत्न करतो पण त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. कोळी संधी साधून अजगराला चावण्याचा प्रयत्न करतो आणि काही वेळानंतर अजगर तडफडून मरण पावल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
अजगर आणि कोळ्याचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. कारण एरव्ही अजगर माणसासह अनेक छोट्या मोठ्या प्राण्यांना विळखा घालून शिकार करत असल्याचं आपण व्हिडीओच्या माध्यमातून पाहतो. पण यावेळी मात्र उलट झालं आहे. एका छोट्याशा कोळ्याने अजगराला विळखा घालून त्याची शिकार केली आहे. कोळ्याच्या जाळ्यात अजगर अडकल्याने कोळ्याने त्याच्यावर हल्ला करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही. ही सर्व थरारक दृष्य कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक झाले आहेत. कारण छोट्या कोळ्यानं अजगराला जाळ्यात अडकवून त्याच्यावर हल्ला चढवल्याचं क्वचितच समोर आलं असेल. पण या व्हिडीओनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.