Spider Crawling In Mans Ear Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं सर्वांच्याच झोपा उडवल्या आहेत. कारण झोपताना आपल्या कानात कधी कोणता किटक घुसेल, याचा आता नेम राहिला नाही. एका कोळ्याने चक्क माणसाच्या कानातच जाळं पसरवलं. कोळी आपल्या कानात घरटं करुन बसला, तरीही त्या माणसाला कळलं नाही. कोळ्याने कानात हालचाली करायला सुरुवात केल्यावर अखेर त्या माणसाला याबाबत माहित झालं. कानात फिरत असलेल्या कोळ्याला कसं बाहेर काढायचं? असा प्रश्न त्या माणसासमोर उभा ठाकला होता. पण त्यानेही मोठी शक्कल लढवली आणि कोळ्याला पळवून लावलं. जाळ्यात अडकलेल्या कोळ्याला बाहेर काढण्यासाठी त्या व्यक्तीने असं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडीओ.
कोळ्याचा व्हिडीओ एका @OTerrifying नावाच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. एका व्यक्ती बेडवर झोपलेला असतो. त्यावेळी त्याच्या कानात कोळी गेल्याचं त्याला कळतं. त्यानंतर त्या कोळ्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्यासोबत असलेला दुसरा माणूस त्याच्या कानात लिक्विड टाकत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. लिक्विड टाकल्यानंतर काही सेकंदातच तो कोळी त्या माणसाच्या कानातून पळ काढतो आणि त्याच्या कपड्यांवर जातो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नक्की वाचा – शेपटीला हात लावताच साप पिसाळला; तरुणाच्या अंगावर उंच उडी मारली अन्…पाहा थरारक Video
इथे पाहा व्हिडीओ
ट्वीटरवर शेअर केलेल्या कोळ्याच्या या व्हिडीओला ६ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर ४४ हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ” मला वाटलं की ते कानाचं वॅक्स करत आहे, पण माझा अंदाज चुकला.” तर दुसरा एक नेटकरी म्हणाला, “रात्री जेव्हा माझा कान दुखतो, तेव्हा मला कानात काहीतरी गेल्यासारखं वाटतं.” अन्य एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “हा तुम्हाला सावधानतेचा इशारा आहे. रात्री झोपताना काळजी घ्या.”