Spiderman Arrested After Riding On Car Bonnet Video Viral: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत स्पायडरमॅनच्या वेशभूषेत असलेली एक व्यक्ती चालत्या कारच्या बोनेटवर बसलेली दिसतेय. पण या स्टंटनंतर त्याला चांगलीच जन्माची अद्दल घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्पायडरमॅनचा व्हायरल व्हिडीओ (Spiderman Viral Video)

दिल्लीतील द्वारका येथे स्पाडरमॅनच्या वेशभूषेत असणारा माणूस महिंद्रा स्कॉर्पियाच्या चालत्या कारच्या बोनेटवर बसलेला दिसला. त्याला पाहताच लोकांनी त्याचे व्हिडीओ काढण्यास सुरूवात केली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच स्कॉर्पिओ कारबाबत तक्रार आली व दिल्ली वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि ‘स्पायडरमॅन’च्या वेषात असलेल्या तरुणाला अटक केली.

‘ANI’ या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या पोस्टनुसार, या ‘स्पायडरमॅन’च्या वेशात असलेल्या २० वर्षीय व्यक्तीचे नाव आदित्य असून तो नजफगढचा रहिवासी आहे. याशिवाय आदित्य ज्या कारच्या बोनेटवर बसला होता ती कार १९ वर्षीय तरूण चालवत होता. कारचा चालक गौरव सिंग हा देशाच्या राजधानीतील महावीर एन्क्लेव्हचा रहिवासी असल्याचे वृत्त आहे. गौरव सिंग याच्यावर धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा… Lizard Found Inside Amazon Parcel: धक्कादायक! ॲमेझॉनवरून केली ऑर्डर अन् बॉक्स उघडताच सापडला जिवंत सरडा; फोटो पाहून थरकाप उडेल

दिल्ली पोलिसांनी केला गुन्हा दाखल

स्टंटसाठी वापरल्या गेलेल्या या कारने याआधी रस्ता सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. ANI ने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, वाहनाच्या मालकावर आणि चालकावर धोकादायक वाहन चालवणे, प्रदूषण प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवणे, सीटबेल्ट न लावणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच दिल्ली ट्रॅफिक पोलिसांच्या विधानानुसार त्यांना सध्या कमाल २६,००० रुपये दंड आणि/किंवा कारावास भोगावा लागणार आहे.

हेही वाचा… “चाचाने दिल जीत लिया”, मराठमोळ्या वयोवृद्ध रिक्षाचालकाचं इंग्रजी ऐकून व्हाल थक्क; VIDEO VIRAL होताच नेटकरी म्हणाले…

“असे बेपर्वाईचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, आणि कायद्याचे पालन करण्यासाठी आणि जीवांचे रक्षण करण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. दिल्ली वाहतूक पोलीस नागरिकांना आवाहन करते की धोकादायक ड्रायव्हिंग किंवा वाहतूक उल्लंघनाच्या कोणत्याही घटनांची त्वरित तक्रार करा. रोड सेफ्टीसाठी आणि शहरातील वाहतूक सुरळीत चालत राहण्यासाठी जनतेचे सहकार्य महत्त्वाचे आहे.” असं दिल्ली पोलिसांनी अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spiderman arrested by delhi police after riding on car bonnet video viral on social media dvr