Spiderman begging at kalyan railway station video viral: स्पायडरमॅन या सुपरहिरोबद्दल अगदी लहानपणापासून सगळ्यांनी ऐकलंच असेल. या स्पायडरमॅनचे अनेक कार्टून, चित्रपट पाहत अनेक जण मोठे झाले आहेत. आता त्याची लोकप्रियता वाढून नव्या पिढीलाही त्याचं वेड लागलं आहे.

लहानपणापासून अनेकांच्या घरात खेळणं म्हणून किंवा सॉफ्ट टॉय म्हणून असलेला स्पायडरमॅन तुम्ही समोर पाहिला तर तुम्हाला किती आनंद होईल. नक्कीच सगळ्यांना त्याची सुपरपॉवर जाणून घ्यायची इच्छा होईल. अनेक जण त्याच्याबरोबर सेल्फीही काढतील.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Google Trend Viral Video something a woman did with a monkey
‘संकटात संयम राखणं महत्त्वाचं…’, विमानतळावर आलेल्या माकडाबरोबर महिलेनं केलं असं काही; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

हेही वाचा… हद्दच झाली! रीलसाठी तरुणाने सायकलस्वार वृद्धाच्या चेहऱ्यावर मारला स्प्रे अन् पुढच्याच क्षणी…, VIDEO पाहून बसेल धक्का

पण, जर तोच स्पायडरमॅन तुम्हाला एका रेल्वेस्थानकाबाहेर भीक मागताना दिसला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? सध्या सोशल मीडियावर एका अशाच स्पायडरमॅनची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात स्पायडरमॅनच्या वेशात असलेला एक तरुण रेल्वेस्थानकाबाहेर भीक मागताना दिसतोय.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये स्पायडरमॅनच्या वेशात असणारा एक इसम चक्क कल्याण रेल्वेस्थानकाच्या बाहेर बसून भीक मागताना दिसतोय. भीक मागत असताना एक माणूस त्याची मदत म्हणून त्याच्या हातात काही पैसे ठेवतो. सुपरहिरोचा पोशाख घालून भीक मागण्याचा हा प्रकार खराखुरा नसून फक्त एका रीलसाठी करण्यात आला होता.

हा व्हिडीओ @shaddyman98 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “या व्हिडीओला स्पायडर मॅनला कोणी तरी काही तरी द्या”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तसंच या व्हिडीओला तब्बल २.८ मिलियन व्ह्यूज आले आहेत आणि एक लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

हेही वाचा… “आज की रात…”, पेट्रोल पंपावर काकांनी धरला जबरदस्त ठेका, VIDEO VIRAL पाहून नेटकरी म्हणाले, “एक नंबर चाचा”

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका व्यक्तीने कमेंट करत लिहिलं, “भिकारी म्हणतील हा कोणता नवा स्पर्धक आला.” तर दुसऱ्याने “बेघर स्पायडर मॅन” अशी कमेंट केली. तर एक जण म्हणाला, “स्पायडरमॅन तू कल्याणमध्ये काय करतोयस?”

दरम्यान, स्पायडरमॅनच्या पोशाखात असलेल्या या तरुणाने त्याच्या सोशल मीडियावर याआधीही स्पायडरमॅनच्या वेशात अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. Spiderman From Mumbai असं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटचं नाव असून त्याचे ५१ हजार फॉलोअर्स आहेत.

Story img Loader