काही लोक स्टंट करण्यात अतिशय पटाईत असतात. त्यांचे धोकादायक स्टंट पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. अनेकदा काहींचे स्टंट यशस्वी ठरतात आणि ते प्रसिद्ध होतात तर अनेकदा स्टंट करत असताना काहींसोबत भयंकर दुर्घटनाही घडतात. म्हणूनच स्टंट करण्याआधी भरपूर सराव करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून कोणतीही चूक किंवा अपघात होणार नाही. सोशल मीडियावर तुम्हाला असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील, ज्यामध्ये लोक वेगवेगळे आणि धोकादायक स्टंट करताना दिसतात. सध्या स्टंटचा असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक स्पायडर मॅन खतरनाक स्टंट करताना दिसून येतोय. पण स्टंट करता करता अचानक असं काही घडतं की ते पाहून हादरून जाल.

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या या  व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, येथे रोबोटद्वारे स्पायडर मॅन स्टंट करत होता. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता हा रोबोट स्पायडर-मॅनच्या लूकमध्ये दिसून येतोय आणि एका दोरीला बांधलेला आहे. पण उंचावर जाऊन त्याचा हा स्टंट यशस्वी होतोच तितक्यात एक घटना घडते आणि हा स्टंट फेल ठरतो. लँडिंग दरम्यान रोबोट क्रॅश होतो. त्याचवेळी खाली उपस्थित मोठ्या संख्येने लोक हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करत होते. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच तो व्हायरल देखील झाला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO: या तीन लहान मुलीचं स्केटबोर्डिंग पाहून तुमचेही डोळे विस्फारतील

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो! अजबच…चक्क बकरीसोबत केलं लग्न, घेतली सोबत जगण्या मरण्याची शपथ!

अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ mdglee_szm नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख २९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. १५ सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि अनेक लोक या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. या सुदैवाने या स्टंटमध्ये कोणताही माणूस नसून एक रोबोट होता. त्यामुळे या घटनेत जीवितहानी टळली. लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करून असे नसते धाडस न करण्याचं आवाहन करताना दिसून येत आहेत.

Story img Loader