आपल्या आवडत्या क्रिकेटरला भेटणं, त्याच्यासोबत एक सेल्फी काढणं, त्याचा ऑटोग्राफ घेणं ही चाहत्यांसाठी किती मोठी गोष्ट आहे हे वेगळं सांगायला नको. ज्या क्रिकेटरला आपण मैदानात खेळताना पाहतो, त्याला प्रत्यक्षात एकदातरी भेटावं, त्याच्याशी दोन शब्द बोलावे हे प्रत्येक चाहत्याचे स्वप्न असतं. पण प्रत्येकाचीच ही स्वप्न काही पूर्ण होत नाहीत, यासाठी नशीब लागतं. काँग्रेसच्या प्रवक्त्या खुशबू सुंदर यांना आपल्या आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी तब्बल ३३ वर्षे वाट पाहावी लागली.

वाचा : चर्चा तर होणारच! पाकिस्तानी गार्डला करायचंय विराट कोहलीशी लग्न

अभिनेत्री म्हणून खुशबू यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्या भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या चाहत्या आहेत. त्यांना एकदा तरी प्रत्यक्षात भेटण्याची संधी मिळावी ही त्यांची कित्येक वर्षांपासूनची इच्छा होती. अखेर ती इच्छा ३ दशकानंतर पूर्ण झाली. खुशबू यांनी रवी शास्त्री यांच्यासोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केलेत. ‘माझं स्वप्न पूर्ण झालंय. दीर्घकाळ प्रतिक्षेचं फळ आज मला मिळालं, त्यांना भेटण्यासाठी मला ३३ वर्षे वाट पाहावी लागली’ असं ट्विट करत त्यांनी शास्त्रींसोबतचा फोटो शेअर केलाय.

वाचा : १०० कोटींची संपत्ती, ३ वर्षांच्या मुलीला सोडून ‘हे’ दाम्पत्य घेणार संन्यास!

Story img Loader