देशभरात दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे, क्रिकेटर्स, सेलिब्रेटी, नेतेमंडळी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देण्याबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही देशवासीयांना मोलाचा संदेशही दिला आहे.

दिवाळीत अनेक ठिकाणी फटाके फोडले जातात. काही ठिकाणी तर फटाके फोडण्याचं प्रमाण इतकं अधिक असतं की आनंदाच्या भरात आपल्यामुळे कोणाचंतरी नुकसान होत आहे याचं भानही लोकांना राहत नाही. ‘तुम्ही दिवाळी जरूर साजरी करा पण ती करताना ज्येष्ठ नागरिक आणि प्राण्यांचाही विचार करा. आपल्या कृतीमुळे त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या’ असा संदेश त्याने देशवासीयांना दिला आहे. फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषण तर होतंच पण आवाजामुळे प्राण्यांनादेखील त्रास होतो, तेव्हा त्यांची काळजी घेण्याची विनंती सचिनने व्हिडिओमार्फत केली आहे.

अन् एका सामान्य मुलीला खरंच स्वप्नातला ‘राजकुमार’ भेटला

इव्हांका ट्रम्पनेही दिल्या भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा !

सचिनने दिवाळीच्या शुभेच्छा देत हा व्हिडिओ ट्विट केला आहे. विराट कोहली, हार्दिक पांड्याने देखील ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून दिवाळीत फटाके न फोडण्याची विनंती आपल्या चाहत्यांना केली आहे.

Story img Loader