Kinjl Mathur on Jobs for Newcomers: अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीय वंशाच्या उद्योजिका किंजिल माथुर या सध्या चर्चेत आल्या आहेत. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या नव्या पिढीतील तरुणांना त्यांनी दिलेला सल्ला या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यांचा सल्ला न पटलेल्या नेटिझन्सनी त्यावर टीकादेखील करायला सुरुवात केली आहे. तसेच, नव्या पिढीतील तरुणांनी पहिल्या नोकरीसाठी कसे प्रयत्न करायला हवेत? यावर चर्चाही सुरू झाली आहे. केंद्र सरकारने नव्या पिढीतील तरुणांना पहिला पगार सरकारकडून देण्याची तसेच इंटर्नशिपसाठी ५ हजार रुपये भत्ता देण्याची घोषणा केलेली असताना किंजिल माथुर यांनी केलेलं विधान व्हायरल झालं आहे.

कोण आहेत किंजिल माथुर?

किंजिल माथुर या स्क्वेअरस्पेस या न्यूयॉर्कमधील कंपनीच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर आहेत. दोन दशकांपूर्वी त्यांनीही अशाचप्रकारे उद्योगविश्वात पाऊल ठेवलं होतं. त्यांच्याकडे फायनान्सची पदवी असूनही त्यांना नोकरी मिळवण्यात अडचणी येत होत्या. त्यावेळी त्यांनी कशाप्रकारे नोकरीसाठी धडपड केली, याबाबत त्यांनी ‘फॉर्च्युन’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

There are signs that Chief Ministers Youth Work Training Scheme is also going to be closed
मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
Pune Video young people of which district live most in pune
Pune Video : पुण्यात कोणत्या जिल्ह्यातील सर्वात जास्त तरुणमंडळी आहेत? नेटकऱ्यांनीच दिले उत्तर
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Prime Minister Narendra Modi  statement on the occasion of Pravasi Bharatiya Diwas
भविष्य हे युद्धाचे नसून, बुद्धांचे! प्रवासी भारतीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
chandrashekhar bawankule reacts on valmik karad case and supriya sule statement
वाल्मिक कराड प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रकरणावर लक्ष; दोषी आढळल्यास कारवाई अटळ, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
committee has been formed under chairmanship of sub-divisional officer of Daryapur to investigate after Kirit Somaiyas allegations
किरिट सोमय्यांच्‍या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…

“मी कंपन्यांमध्ये नोकरी मागण्यासाठी जायचे. मी त्यांना इंटर्नशिप तरी मिळेल का? अशी चौकशी करायचे. माझी कोणत्याही मोबदल्याशिवाय काम करण्याचीही तयारी होती”, असं त्या म्हणाल्या. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये शिकताना ट्रॅव्हलॉसिटीमध्ये त्यांची पहिली इंटर्नशिप केली. त्यानंतर काँड नेस्ट, सॅक्स फिफ्थ अवेन्यू आणि फोरस्क्वेअर अशा कंपन्यांमध्ये त्यांनी काम केल्यानंतर आता त्या स्क्वेअरस्पेस कंपनीमध्ये चीफ मार्केटिंग ऑफिसर म्हणून रुजू आहेत. (Jobs in Squarespace)

“कोणतंही काम करण्यासाठी तयार राहा”

किंजिल माथुर यांनी यावेळी तरुण पिढीला कोणत्याही प्रकारच्या कामासाठी, अगदी काही प्रसंगी मोफत काम करण्यासाठीही तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. “मी प्रत्येकवेळी इंटर्नशिपसाठी प्रयत्न करायचे. माझा फक्त एकच हेतू होता, मला अनुभव हवा होता. तुमच्या करीअरच्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला कितीही कष्ट करण्याची तयारी ठेवायला हवी”, असं त्या म्हणाल्या. (Tips for Jobs in Big Companies)

“मी तेव्हा कोणत्याही मोबदल्याशिवाय काम करण्याच्याही तयारीत होते. कितीही आणि कोणत्याही वेळी, अगदी वीकएंड्सलाही. मला त्यासाठी किती प्रवास करावा लागेल, यानं फरक पडत नव्हता. तुमची कोणतंही काम करण्याची तयारी असायला हवी. कोणत्याही वेळी, कितीही पैशांच्या मोबदल्यात, कोणत्याही प्रकारचं काम करण्याची तुमची तयारी हवी”, असंही त्या म्हणाल्या.

नेटिझन्सकडून संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, फॉर्च्युनमध्ये छापून आलेल्या माथुर यांच्या मुलाखतीवर नेटिझन्सकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. “भांडवलशाहीचा हा कोणता स्तर आहे?” असा सवाल एका युजरनं केला आहे. काहींनी माथुर यांच्यावर टीका केली आहे. “किंजिल माथुर यांच्या मुलाखतीचा सारांश म्हणजे कामगार म्हणून माझं शोषण झालं आणि आता मी बदल घडवू शकेन अशा पदावर आहे. पण आता मीही नव्या पिढीसमोर नोकरीसंदर्भात तशाच प्रकारची भिंत उभी करेन”, असं एका युजरनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सोशल मीडियावर माथुर यांच्या Jobs संदर्भातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून त्यांच्या या विधानामुळे त्या काम करत असलेल्या स्क्वेअरस्पेस कंपनीवरही टीका केली जात आहे.

Story img Loader