squirrel Viral Video : हृदयाला स्पर्श करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बहिण-भावाच्या पवित्र नात्याप्रमाणेच एका खारुताईसाठी एक तरुण धावून आला. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या या खारुताईला एका भावानं पिण्याचं पाणी पाजलं. पाण्यासाठी हात जोडून पुढं आलेल्या खारुताईची पाण्याने ओंजळ भरून या तरुणानं सर्वांचीच मनं जिंकली. हा सुंदर व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून लाखो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तरुणाने दाखवलेल्या मानवता धर्माचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. खारुताईला संकटकाळात मदत केल्याने तरुणावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तरुणावर उधळली स्तुतीसुमने
सोशल मीडियावर मनं जिंकणारा हा व्हिडीओ @MahantaYogiG नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सुंदर कॅप्शनही देण्यात आलं आहे. ‘पाण्याचं महत्व समजून घ्या’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तहानेनं व्याकुळ झालेल्या एका खारुताईला तरुणाने पाणी दिलं. खारुताई हात जोडून पाण्यासाठी पुढे पुढे येत असताना पाण्याच्या बॉटलने तिची तहान भागवल्याचं सुंदर दृष्य कॅमेरात कैद झालं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही प्रचंड भावूक व्हाल, यात तीळमात्र शंका नाही. कारण हा व्हिडीओ हृदयाला स्पर्श करणारा आहे.
इथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. इंटरनेटवर तरुणावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत. एका नेटकऱ्यानं प्रतिक्रिया देत म्हटलं की, “माणसामुळेच आज पृथ्वीवरील सर्व जीवजंतू संकटात सापडले आहेत. नदीचं पाणी आटलं जात आहे.” या व्हिडीओला आतापर्यंत ७३ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना खूप आनंद झाला आहे. कारण काही माणसांमध्ये मानवता धर्म आजही जिवंत असल्याचं उत्तम उदाहरण या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.