Viral video: कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत, माणसांपासून जनावरांपर्यंत सगळेच उष्णतेने हैराण झाले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये पारा ५० च्या आसपास आहे. या धोकादायक उष्णतेपासून कोणत्याही प्रकारे दिलासा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. कमाल तापमानाचा फटका बसत असतानाच मुक्या पक्षी आणि प्राण्यांनाही याचा फटका बसत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याने दिलासा म्हणून शक्य असेल त्या जागी पक्ष्यांना पिण्याचे पाणी एखाद्या भांड्यामध्ये ठेवावे. दरम्यान तुम्ही गाई, म्हशी, घोडे आणि इतर अनेक पाळीव प्राणी पाणी मागताना किंवा पिताना पाहिले असतील, पण तुम्ही कधी खारुताईला हुशारीने पाणी मागताना पाहिले आहे का? अशाच एका खारुताईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा