सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे, असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. अगदी मिनिटा-मिनिटाला सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सोशल मीडियाला आता दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी हिच्यासारखी सेम टू सेम दिसणारी तरूणी सापडलीय. तिचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. नेटकऱ्यांचं असं म्हणणं आहे की, या तरूणीचा चहेरा दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीशी अगदी मिळता जुळता आहे. फक्त चेहराच नाहीतर, या तरूणीचे हावभाव, डोळे, ओठ सारं काही श्रीदेवीशी मिळते जुळते असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसारखी सेम टू सेम दिसणाऱ्या या तरूणीचं नाव दीपाली चौधरी असं आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरील तिचे फोटोज आणि व्हिडीओज पाहिले की तुमच्या लक्षात येईल, की तिचा संपूर्ण फेस कट हा श्रीदेवीसारखाच आहे. दीपाली चौधरीचे इन्स्टाग्रामवर ३० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती नेहमीच श्रीदेवीच्या लूकमधील तिचे फोटो आणि तिच्या चित्रपटातील शूटिंग सीन्स पोस्ट करत असते.
आणखी वाचा : आईस्क्रीमवाल्याच्या अंतिम यात्रेचा VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल
दिपाली चौधरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर श्रीदेवीच्या प्रसिद्ध चित्रपटांमधील गाजलेल्या सीन्सवर व्हिडीओ तयार केले आहेत. तिचे हे व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत. पण दिपाली चौधरी ही पहिली युजर नाही जिने स्वत:ला अभिनेत्रीसारखा लूक दिला आहे. याआधी कियारा अडवाणीच्या लूक अ लाईक सुद्धा चर्चेत आली आहे. दीपाली चौधरी ही ब्लॉगर आहे. तिच्या पोस्टच्या खाली कमेंट करून चाहते तिला ‘दुसरी श्रीदेवी’ म्हणत आहेत. तिचे हे व्हायरल व्हिडीओ पाहून काही क्षणासाठी श्रीदेवी पुन्हा परतली आहे की काय, असा भास होवू लागतो.
दीपालीच्या इन्स्टाग्रामवर तुम्ही भेट दिली तिने श्रीदेवीच्या अनेक चित्रपटांवर तयार केलेले व्हिडीओ तुमच्या नजरेस पडतील. नुकतंच तिने शेअर केलेले नवा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमध्ये तिने १९९४ साली श्रीदेवीचा रिलीज झालेल्या ‘लाडला’ या चित्रपटातील एका सीनवर अभिनय केलाय. या व्हिडीओमध्ये तिने श्रीदेवीसारखेच कपडे परिधान केले आहेत. तिने ड्रेससोबत रेड पर्ल नेकपीस आणि गोल्डन इअर रिंग्स देखील कॅरी केल्या आहेत. व्हिडीओतील दिपालीचा लूक आणि स्टाइल हुबेहुब श्रीदेवीसारखी आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : मस्ती मस्तीत रॉकेट पेटवला, पण तो उडत उडत बिल्डिंगमध्ये घुसला, पुढे जे झालं ते पाहा!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
अनेक व्हिडीओमध्ये तर तिने श्रीदेवीच्या गाजलेल्या गाण्यावर लिप-सिंक केले आहेत. तिच्या अनेक व्हिडीओजना नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय. दिपालीचे व्हिडीओ आणि अभिनय कौशल्य पाहून चाहते खूप खूश आहेत. चाहते तिला श्रीदेवीची कॉपी म्हणत आहेत. एका युजरने व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं, “अगदी श्रीदेवीसारखी.” दुसर्या युजरने व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं की,” रागावलेली श्रीदेवी अजून चांगली दिसत आहे…”