साऊथ सुपरस्टार अर्जुन अल्लू आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर तो सुपरहिट ठरला आहे. केवळ बॉक्स ऑफिसवरंच नव्हे तर सोशल मीडियावर सुद्धा या चित्रपटाच्या ‘श्रीवल्ली’ गाण्याने सर्वांवर आपली जादू पसरवली आहे. तुम्ही सुद्धा जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर मोबाईल चाळताना एकदा तरी हे सुपरहिट गाणं तुमच्या नजरेस पडलं असेल. हे गाणं सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतंय. एखादं गाणं गाजलं आणि त्याचं मराठी वर्जन आलं नाही, असं होईल का कधी? ‘*श्रीवल्ली’ गाण्याची वाढती क्रेझ पाहून आता या गाण्याचं मराठी वर्जन सोशल मीडियावर धडकलंय. साऊथ इंडियन गाण्याला मराठी ठेक्यांचा तडका ऐकून तुम्ही सुद्धा दंग व्हाल, हे मात्र नक्की.
गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘मनिके मागे हिथे’ गाण्याचं मराठी वर्जन गाणारा पुण्यातला ट्रॅफिक हवालदार आठवतोय का? देशभरात या ‘मनिके मागे हिथे’ गाण्याचे वेगवेगळ्या भाषेतील वर्जन सॉंग येत असताना या पुणेकर ट्रॅफिक हवालदाराने मराठी वर्जन तयार करून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. आता सोशल मीडियावर ‘पुष्षा’ चित्रपटातल्या श्रीवल्ली गाण्याचा फिवर चढलेला असून या पुणेकर ट्रॅफिक हवालदाराने या गाण्यावर सुद्धा मराठी वर्जन तयार केलंय. ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या या मराठी वर्जन सॉंगमुळे हा ट्रफिक हवालदार पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
आणखी वाचा : खाकी वर्दीतला ‘बाप’माणूस! लेकीकडून मेकअप करवून घेताना IPS पित्याचा VIDEO VIRAL
पुणे पोलिस दलात ट्रॅफिक पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या आतिश खराडे यांनी या गाण्याचं मराठी वर्जन गायलंय. ‘श्रीवल्ली’ या साउथ गाण्याला मराठी ठेक्यांचा तडका देत त्यांनी हे गाणं गायलंय. श्रीवल्लीच्या मराठी वर्जन सॉंगचा एक व्हिडीओ त्यांनी आपल्या AK Police नावाच्या युट्यूब चॅनवरून शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ते स्वतः त्यांच्या ट्रॅफिक हवालदाराच्या युनिफॉर्ममध्ये दिसून येत आहे. तसंच ‘श्रीवल्ली’चं मराठी वर्जन सॉंग ते स्वतः एन्जॉय करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर श्रीवल्लीच्या मराठी व्हर्जनला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. हे मराठी वर्जन सॉंग फक्त गायलंय नाही तर व्हिडीओ सुद्धा तयार केलाय. या व्हिडीओमधून एक मराठमोठी लव्हस्टोरी सुद्धा दाखवण्यात आलीय.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : बादशाहच्या ‘सजना’ गाण्यावर विदेशी ‘डान्सिंग डॅड’नी केला जबरदस्त डान्स
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : चक्क सापासोबत खेळायला निघाला होता, नंतर जे झालं ते पाहून तुमच्या अंगावर काटा येईल
अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदना यांच्या ‘श्रीवल्ली’ गाण्यापाठोपाठ आता ट्रॅफिक हवालदाराने गायलेल्या याच्या मराठी वर्जनला सुद्धा लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय. अनेक युजर्सनी तर या मराठी वर्जन सॉंगवर वेगवेगळे रील्स शेअर करण्यास सुरूवात देखील केलीय. आतिश खराडे यांनी ११ जानेवारी रोजी हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. आतापर्यंत या मराठी वर्जनला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच व्हिडीओखाली कमेंट करत लोक त्यांच्या गायनाचं कौतुक करत आहेत.
आणखी वाचा : खाकी वर्दीचा धाक दाखवून आधी पॅंट साफ करायला लावली, मग कानशिलात मारली…लेडी कॉन्स्टेबलचा हा VIDEO VIRAL
काही दिवसांपूर्वी ‘मनिके मागे हिथे’ गाण्याच्या मराठी वर्जनमुळे आतिश खराडे सोशल मीडियावर चर्चेत आले होते. पोलीस दलातली नोकरी सांभाळून ते आपला गायनाचा छंद जोपासत आहेत. नोकरी सांभाळून गायकीचा अभ्यास, रियाज आणि लिखानसुध्दा ते स्वतःच करतात. शाळेपासून त्यांना गाण्याची प्रचंड आवड होती. पण पोटापाण्यासाठी नोकरी देखील महत्वाची होती. म्हणून त्यांना गायनात करिअर करता आलं नाही. पण नोकरी करता करता ते गाणं गात आपला छंद जोपासत आहेत.