राज्य परिवहन महामंडळाच्या बसनी (MSRTC) दरदिवशी राज्यातील हजारो लोक प्रवास करतात. याला लोक आवडीने लालपरीसुद्धा म्हणतात. अगदी शहरापासून खेड्यापर्यंत पोहचवणारी लालपरी अनेकांच्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. या जीवनवाहिनीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी लालपरीचे कंडक्टर – ड्रायव्हर चर्चेत येतात तर कधी लालपरीमधील मजेशीर किंवा थक्क करणारे किस्से सुद्धा व्हायरल होतात. (VIDEO : ST Bus Lalpari’s Poor Condition Sparks Outrage on Social Media)

सध्या एका लालपरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला लालपरीची बिकट अवस्था दिसून येईल. व्हिडीओमध्ये दाखवलेली एसटी बसची अवस्था पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून संताप येईल.

हेही वाचा : शेवटी बायको ही बायकोच असते! दारू पिऊन भररस्त्यात पडलेल्या नवऱ्याला खांद्यावर उचलून घरी नेले, Viral होतोय Video

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक लालपरी दिसेल. हा व्हिडीओ धावत्या लालपरीमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने शूट केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला लालपरीची अत्यंत बिकट अवस्था दिसून येईल. अशा बसमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. वव्हिडीओमध्ये तुम्हाला बसचालक बस चालवताना दिसेल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला बस क्रमांक सुद्धा दाखवला आहे. या बसचा क्रमांक MH- 14/BT-1446 असून ही बस मुरुड डेपोतील आहे.

पाहा व्हायरल व्हायरल (Viral Video)

yeva.konkan.aaploch.aasa या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ही पहा आपल्या लाल परीची अवस्था. अक्षरशः गाडी तुटलेली आहे. अलिबागवरून मुरुड ला जाणारी मुरुड डेपोची बस”

हेही वाचा : पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पायाने पीठ मळून घेतले आणि नंतर टॉयलेट क्लिनर मिसळले; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मुरुड डेपोला अशाच भंगार बस आहेत सगळ्या” तर एका युजरने लिहिलेय, “हिला लाल परी म्हणणे… म्हणजे गाढवाला…. हरीण म्हणणे असं होईल….” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही चूक लोकांची आहे, अशा गाडीत न बसता, मोकळी पाठवली ऑटोमॅटिक भंगारचां रस्ता मिळेल.” एक युजर लिहितो, “आपण कोकणवाशी काहीच बोलत नाही ना त्यांचे हे फायदे आहेत……” तर एक युजर लिहितो, “दर वेळी सामान्य माणसांनीच भोगायच….”