महाराष्ट्राची लाडकी लालपरी म्हणजेच एसटी(स्टेट ट्रान्सपोर्ट) बसने आजही लाखो लोक प्रवास करतात. अत्यंत सोयिस्कर आणि खिशाला परवडणारी अशी सार्वजनिक वाहतूक सुविधा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक विविध शहरात किंवा तीर्थस्थानी भेट देण्यासाठी एसटी बसने प्रवास करतात. गेल्या काही वर्षात वाढत्या लोकसंख्या आणि महाराष्ट्रात येणाऱ्या स्थलांतरित नागरिकांचे प्रमाण पाहात एसटी बसची संख्या तुलनेमध्ये अत्यंत कमी आहे, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा प्रवास गर्दीमध्ये उभे राहून प्रवास करताना दिसतात. बसमध्ये सुखकर प्रवासासाठी जागा मिळवणे ही एक मोठी स्पर्धाच झाली आहे. बसमध्ये जागा मिळण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात, कधी कोणी खिडकीतून पिशवी टाकते तर कधी कोणी थेट खिडकीतूनच एसटीबसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करते. खिडकीमधून एसटीबस चढणाऱ्या प्रवाशांचे व्हिडिओ केल्या काही महिन्यांमध्ये वारंवार चर्चेत आले आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा असाच एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क दोन-तीन प्रवासी खिडकीमधून बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे. एक व्यक्ती खिडकीतून पिशवी ठेवत आहे. हा सर्व प्रकार फक्त बसमध्ये बसण्यासाठी जागा मिळवण्यासाठी सुरु आहे. हा व्हिडिओ apli_lalpari नावाच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,यांना कोणीतरी सांगा रे..! दरवाजा नाही ती खिडकी आहे.” तसेच पुढे लिहिले आहे की, महामंडळाने एसटी स्टंडवर पोलिस बंदोबस्त केला पाहिजे याशिवाय हे लोक सुधारणार नाही.

हेही वाचा – “परिस्थिती सगळं शिकवते!” लहान वयात भाकरी करत्येय शेतकऱ्याची लेक, Viral Video एकदा बघाच

हेही वाचा – “बाप-लेकाची भन्नाट जोडी!”, मुलाने हटके स्टाईलमध्ये दिलं खास गिफ्ट, वडीलांची प्रतिक्रिया पाहून पोट धरून हसाल, पाहा Viral Video

हा Video सध्या तुफान Viral होत आहे. Viral Videoवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “बस स्थानकावर आल्यानंतर वाहकाने सर्व खिडक्या बंद केल्या पाहिजेत”

दुसऱ्याने लिहिले, नाशिकमध्ये हा प्रकार जरा जास्त पाहायला मिळतो. एक रुमाल टाकून चार जागा राखून ठेवतात.”

तिसऱ्याने लिहिले, “हे अत्यंत चुकीचं आहे”