सध्याच्या काळात अनेक लोकांना सोशल मीडियावर काहीही करून फेमस व्हायचे असते. यासाठी ते काहीही करायला तयार असतात. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काहीजण विचित्र डान्स करतात, तर काही जण बाईकवर जीवघेणा स्टंट करतात. नुकतेच एका तरुणाने चक्क बैलावर बसून शहरातून भरधाव वेगाने फेरफटका मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र त्याला हा विचित्र स्टंट करणं चांगलच महागात पडलं, कारण त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
अशातच आता आणखी एका तरुणाचा असाच स्टंट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो भरधाव वेगात असणाऱ्या बाईकवर उभा राहून जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. परंतु त्याला हा स्टंट करणे अंगलट आले आहे. कारण आता पोलिसांनी त्याच्यावर कारवाई व्हिडीओतील तरुणाला अटक केली आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील गौतम बुद्ध पार्कचा येथील आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण हँडल सोडून बाईक चालवताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाईकवर उभं राहिल्यानंतर या तरुणाने खिशातून गुटख्यासारखा काहीतरी पदार्थ खाल्ला. त्याच्या या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक करत त्याच्यावर कडक कारवाई केली आहे.
स्टंटच्या नादात जातो जीव –
हेही पाहा- आधीच दारुची नशा त्यात GPS मुळे चुकली दिशा; २ महिला कारसह थेट समुद्रात गेल्याचा मजेशीर Video व्हायरल
या विचित्र स्टंटचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करण्यासोबतच त्यांनी या व्हिडीओत स्टंट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याचेही सांगितले आहे. तर अशा प्रकारची स्टंटबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, तरुणांच्या अशा जीवघेण्या स्टंटच्या नादात अनेकांना मोठ्या अपघातांचा सामना करावा लागतो. शिवाय अशा अपघातांमध्ये त्यांचा मृत्यू होण्याचीही शक्यता खूप असते. नुकतेच एका प्रसिद्ध युट्यूबरचा ताशी ३०० किमी. वेगाने बाईक चालवताना अपघात झाला होता, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे असे स्ंटट करणे महागात पडू शकते आणि जीवावरही बेतू शकते.