कित्येकांना जंगल सफारीची आवड असते. वाघाचे दर्शन घेण्यासाठी लोक ‘जंगल सफारी’वर जातात. पण पहिल्याच प्रयत्नात त्यांना वाघ दिसलेच असे नाही. त्यामुळे ते व्याघ्र प्रकल्पाच्या वेगवेगळ्या झोनला एकदा नव्हे तर दोन ते तीन वेळा भेट देतात. पण तरीही अनेकांना वाघाच्या पंजाच्या खुणाही दिसत नाहीत. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने लोकांना धक्काच बसला आहे.
अचानक आपल्यासमोर वाघ आल्यास काय करणार अशा प्रकारचे प्रश्न असलेला निबंध आपण केव्हातरी नक्कीच वाचला असेल. पण आता हे खऱ्या आयुष्यातही झालं आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एक माणूस रस्त्याने आरामात चालत असताना त्याच्या समोर अचानक वाघ आला आणि माणसाचे धाबे दणाणले. हा व्हिडिओ उत्तराखंड येथील असल्याचे सांगण्यात येत असून जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या आसपास लोकांवर वाघांचे हल्ले वाढत आहेत. आता कॉर्बेट नॅशनल पार्कजवळील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती मंदिरात दर्शनासाठी जात असताना अचानक त्याच्यासमोर वाघ आला.
त्या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती पिशवी घेऊन जाताना दिसत आहे. त्या व्यक्तीला अजिबात टेन्शन नाही. किंवा त्याला असं वाटतं सुध्दा नाही की, आता माझ्यावरती कुठलाही प्राणी हल्ला करु शकतो. त्याचवेळी अचानक समोरच्या बाजूने वाघ येतो. मग पुढे काय झालं ते तुम्ही व्हिडीओत पाहा.
(हे ही वाचा : Video: आला अंगावर घेतलं शिंगावर; चवताळलेल्या बैलाशी मस्ती करणं अंगलट, तरुणाला थेट… )
येथे पाहा व्हिडिओ
हा व्हायरल व्हिडीओ आज सकाळचा (शुक्रवारी) असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती पिशवी घेऊन रस्त्याने जात होती. रस्त्याने चालत असताना या माणसाच्या समोरुन अचानक वाघ येतो. हा वाघ एक प्रौढ वाघ होता, ज्याच्या डरकाळ्याने लोक हादरतात! तथापि, तो माणूस खूप नशीबवान होता कारण वाघाचे त्या माणसाकडे लक्ष नव्हते आणि तो वाघ रस्ता ओलांडून पटकन तिथून निघून गेला. हे पाहून सोशल मीडिया यूजर्सची अवस्था बिकट झाली. यामुळेच लोक या व्यक्तीला सर्वात भाग्यवान व्यक्ती म्हणत आहेत.
हा धक्कादायक व्हिडिओ ‘भारतीय वन सेवा अधिकारी’ (IFS) परवीन कासवान (@ParveenKaswan) यांनी ८ डिसेंबर रोजी X (पूर्वीचे ट्वीटर) वर पोस्ट केला आणि लिहिले, “हा सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे का?”. आत्तापर्यंत IFS च्या या पोस्टला ५४ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि एक हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, “सर, उत्तराखंडच्या लोकांसाठी ही सामान्य गोष्ट आहे. तर दुसऱ्याने सांगितले की, “त्या व्यक्तीवर देवीची कृपा आहे.” काहींनी आनंद घेतला आणि लिहिले, “वाघ उपोषणावर होता.”