फिफा विश्वचषक २०२२ च्या रंगतदार स्पर्धेत श्वास रोखून धरणारे सामने पाहिल्यानंतर आता अंतिम सामना पाहण्यासाठी अवघ्या क्रिडा विश्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १८ डिसेंबर रोजी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात लुसेल स्टेडियमवर अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या पासबुकचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोचं अर्जेंटिनासोबत नेमकं कनेक्शन काय आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

गरुडासारखी नजर असणाऱ्या लोकांनी या फोटोतील आणि अर्जेंटिना संघातील समानता ओळखली असेल. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या पासबुकचा व्हायरल झालेला फोटो अर्जेंटिना आणि त्यांचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीलाही प्रचंड आवडला आहे. कारण या फोटोचं आणि अर्जेंटिना संघाचं कनेक्शनही तितकच खास आहे. कारण तीक्ष्ण नजर असलेल्या नेटकऱ्यांनी एसबीआच्या फोटोत आणि अर्जेंटिना संघाच्या जर्सीत समानता बघीतली आहे. त्यामुळे SBI बॅंकेच्या पासबुकचा फोटो फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल होत आहे.

नक्की वाचा – अश्लील व्हिडीओ दाखवून मुलींचा विनयभंग करायचा, हॉस्टेलच्या मुलींनी लाठ्या-काठ्यांनी मुख्याध्यापकाची केली धुलाई, Video होतोय Viral

इथे पाहा फोटो

अर्जेंटिना संघाता स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचे संपूर्ण जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. पण भारतातही मेस्सीवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची कमी नाहीय. हा फोटो शेअर केल्यानंतर अर्जेंटिना आणि मेस्सीच्या चाहत्यांना विलक्षण आनंद झाला आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. रेल्वे अधिकारी आनन्थ रुपानागुडी यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. “भारतीयांना अर्जेंटिनाचा फुटबॉलचा संघ का आवडतो, यामागचं हे एक कारण असू शकतं. कारण त्यांच्या कपड्यांमध्ये खूपच समानता आहे”, असं कॅप्शनही त्यांनी या ट्विटमध्ये दिलं आहे.

Story img Loader