सध्या भारत विरुद्ध इंडिया, असा वाद अधिक तीव्र होताना दिसत आहे. राष्ट्रपतींच्या G-20 निमंत्रण पत्रावर राष्ट्रपतींना ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिले गेले; ज्यामुळे वादाला तोंड फुटले. याच मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसतोय. विरोधक यावर प्रश्न उपस्थित करीत असताना भाजपा नेते मात्र जोरदार समर्थन करीत आहेत. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही यावरून चांगलीच चर्चा रंगतेय. सोशल मीडियावर लोक भारत आणि इंडियावरून आपापले तर्क लढवीत आहेत. त्यावर अनेक मीम्स क्रिएटरदेखील मजेशीर मीम्स शेअर करीत आहेत. त्यात खरेच जर देशाचे इंडिया नाव बदलून भारत झाले, तर कोणकोणत्या गोष्टींची नावे बदलावी लागू शकतात याचे एक मजेशीर मीम एका युजरने शेअर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया विरुद्ध भारतवरून सोशल मीडिया मीम्सचा महापूर

देशाचे नाव बदलून इंडियाऐवजी भारत करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या निर्णयावरून आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या मीम्स व्हायरल होत आहेत. अशाच एका पेजवर अनेक प्रकारची कार्डस् शेअर करण्यात आली आहेत; ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियापासून ते इंडिया गेटपर्यंतच्या नावांत बदल करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये ज्या ज्या गोष्टींमध्ये इंडिया शब्दाचा उल्लेख आहे त्यात भारत असा बदल करण्यात आला आहे.

आयपीएलपासून इंडिया गेटपर्यंतच्या नावांत केला बदल

या पोस्टमध्ये लिहिले आहे की, देशाचे नाव ‘इंडिया’वरून ‘भारत’ केल्यास स्टेट बँक ऑफ इंडियाला स्टेट बँक ऑफ भारत म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे इंडिया गेटला भारत गेट आणि गेटवे ऑफ इंडियाला गेटवे ऑफ भारत म्हणावे लागेल. याशिवाय आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) हे नाव बदलले जाऊन तिथे भारत प्रीमियर लीग असे लिहिले गेले आहे. त्याचप्रमाणे एअर इंडियाला एअर भारत आणि मुंबई इंडियन्सला मुंबई भारत असे लिहावे लागू शकते, असा सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. trolls_official या अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे.

ट्विटरवर अशाच अनेक फनी मीम्सही शेअर केल्या जात आहेत, कुणी नोटेचा फोटो शेअर करीत आहे, तर कुणी त्याच्या पासपोर्ट, पॅन कार्ड व आधार कार्डाचा फोटो शेअर करीत आम्हाला यावरही इंडियाऐवजी भारत करून घ्यावे लागेल का?

मात्र, नाव बदलण्याबाबत कोणताही विचार केला जात नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे भाजप नेते सातत्याने नाव बदलण्याची मागणी करीत असून, विरोधी पक्षांकडून त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State bank of india to india gate and ipl name changing because india vs bharat row funny memes going viral amid india bharat debate sjr