सध्या उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथील एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन चोरट्यांनी चक्क गाईच्या वासराची चोरी केल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशातील जनावरंदेखील सुरक्षित नसल्याचं नेटकरी म्हणत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना मुझफ्फरनगर येथील नवीन मंडी कोतवाली भागातील इंडियन कॉलनी येथे रात्री दीडच्या सुमारास घडली आहे.

गाईचे वासरु रस्त्याच्या कडेला उभे असताना अल्टो कारमधून आलेल्या दोन जणांनी त्या वासराला कारमध्ये घालून पळवलं ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणी नवीन मंडीचे सीओ हिमांशू गौरव यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या असून आरोपींचा शोध सुरु आहे.

हेही पाहा- लग्नाचे फोटो काढण्याच्या नादात महिला थेट नाल्यात पडली; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

वासराला बळजबरी कारमध्ये घातलं –

व्हिडीओमध्ये गाईचे वासरु रस्त्याच्या कडेला उभं असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी तिथे एक अल्टो कार येते. त्या कारमधून दोन लोकं तोंडाला रुमाल बांधून उतरल्याचं दिसत आहे. एक गाडीजवळ उभा राहतो आणि दुसरा तरुण वासराच्या जवळ येताना दिसत आहे. यानंतर या दोन आरोपींनी वासराला बळजबरीने गाडीजवळ घेऊन जातो. दरम्यान, वासरु पळून जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच तरुणाचा दुसरा साथीदार मदतीला येतो. दोघांनी वासराला पकडून गाडीत घातलं आणि घटनास्थळावरून कार घेऊन पळ काढतो.

हेही पाहा- दुचाकीच्या नंबर प्लेटवरचा भगव्या रंगातील ‘तो’ मजकूर तरुणाला पडला महागात; पोलिसांनी केली मोठी कारवाई

तपासासाठी दोन पथके तयार –

गाईच्या वासराच्या चोरीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दोन पथके तयार करण्यात आली आहेत. CCTV फुटेजच्या आधारे जनावरे चोरणाऱ्यांना आरोपींना पकडण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. तर नवीन मंडीचे सीओ हिमांशू गौरव सांगतात की, या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच जनावरांची चोरी करण्याला आरोपींना अटक करणार असल्याचं सांगितलं.

Story img Loader