Viral video: दिवसेंदिवस सोशल मीडियाची क्रेझ वाढत चालली आहे. लोक आपला बराच वेळ इंटरनेटवर व्हिडीओ पाहण्यात घालवतात. सोशल मीडियावर दिवसाला अनेक निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धोकादायक, भावुक, थक्क करणारे व्हिडीओ असतात. प्राण्यांचेही अनेक व्हिडीओ समोर येत असतात. नुकताच मांजरीचा एक व्हिडीओ समोर आलाय. सोशल मीडियावर मांजरीसंबधीत व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. आजकाल मांजरींवर फक्त मीम्स तयार होत नाही तर वेगवेगळे मजेशीर व्हिडिओ समोर येत आहेत.’कॅट लव्हर्स’ आपल्या मांजरीला जीवापाड जपतात. मात्र आता एका बदमाश मांजराचा व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये ते चक्क चतुराईने काळ्या रंगाच्या बॅगेतून पैसे चोरत आहे.
या व्हिडीओमध्ये तुमही पाहू शकता, एका मांजरीने चांगलात आगाऊपणा केला आहे. एक काळ्या रंगाची बॅग खुर्चीवर ठेवलेली दिसत आहे. ती बॅग आधीच उघडी आहे. त्या बॅगेत तोंड घालून मांजर काहीतरी शोधताना दिसत आहे. काही वेळाने ती बॅगेतून नोटांचा बंडल घेऊन बाहेर येते. यानंतर मांजर टेबलावरुन खाली उतरते आणि नंतर दारातून बाहेर जाते. मांजरीचं हे कृत्य गोंडस आणि तितकंच धक्कादायक आहे .
या बॅगच्या मालकाला जेव्हा हे कळेल तेव्हा तोही पुरता गोंधळून जोईल. या मांजरीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> भिंतीवरुन उडी घेत बिबट्याचा थेट लोकांनी भरलेल्या व्हॅनवर हल्ला, पिसाळलेल्या बिबट्याचा थरारक VIDEO व्हायरल
‘हळूच मांजरीने आपल्या मालकाच्या बॅगेतून पैसे चोरी केले’ अशा कॅप्शनसह ‘द पेट कलेक्टिव्ह’ नावाच्या यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. नेटकरीही या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.