तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांचे निधन होऊन आज एक आठवडा झाला. गेल्या रविवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. पण सोमवारी अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या विषयी अनेक किस्से चर्चिले गेले. अनेक अफवांना पेव फुटले. अशातच गेल्या दोन दिवसांपासून जयललिता यांच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिरवी साडी नेसलेली, गो-या वर्णाची एक महिला त्यांची मुलगी असल्याचे सांगितले जात आहे. जयललिता यांनी आपल्या मुलीची ओळख जगापासून लपवून ठेवली होती असे संदेशात म्हटले जाते. पण, या फोटोमागचे सत्य काही वेगळे आहे.
जयललिता यांच्याकडे होत्या १० हजारांहूनही अधिक साड्या?
हिरवी साडी घातलेल्या एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला जयललिता यांची कन्या असल्याचे सांगितले जाते. जयललिता यांनी या मुलीची ओळख लपवून ठेवल्याचे म्हटले होते. पण जेव्हा हा फोटो प्रख्यात पार्श्वगायिक चिन्मयी श्रीपदा हिच्याकडे पोहचला, तेव्हा मात्र तिने या व्हायरल फोटोंचे सत्य समोर आणले. व्हायरल झालेली महिला ही जयललिता यांची कन्या नसून ती प्रख्यात मृदंगवादक त्रिवंद्रम यांच्या कुटुंबातली एक सदस्य असल्याचे तिने ट्विट केले. तसेच तिने फेसबुकवरही पोस्ट टाकून अशी खोटी माहिती न पसरवण्याचे आवाहन केले आहे. चिन्मयी हिने फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही सोशल मीडियावर या फोटोचे सत्य उघड केले. तसेच जयललिता यांच्याबद्दल चुकीच्या अफवा न पसरवण्याची विनंती त्यांनी केली आहे. एका माथेफिरूने उगाच बदनामी करण्यासाठी हा संदेश व्हायरल केला आहे. तेव्हा यावर कोणीही विश्वास ठेवू नये असेही अण्णा द्रमुककडून सांगण्यात आले आहे. तसेच ही जयललिता यांची कन्या नसल्याचेही या पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
She belongs to renowned Mridangam Vidwan Trivandrum Balaji’s family. He acts in these web series called ‘HusBanned’.
— Chinmayi Sripaada (@Chinmayi) December 11, 2016