आजच्या काळात नोकरी, व्यवसाय आणि करिअरसाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला काम आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण अनेकदा कंपनीतील टॉक्सिक वर्कलाईफमुळे अनेक कर्मचार्यांच्या वैयक्तिक आयुष्य, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. काही दिवसापूर्वीच पुण्यातील एका तरुणीचा कामाच्या ताणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला. या घटनेनंतर टॉक्सिक वर्कलाईफबाबत अनेकांनी आपले अनुभव आणि मत मांडले होते. दरम्यान बंगळुरूमध्ये दुर्गापूजेदरम्यान एक व्यक्ती नुकताच हातात लॅपटॉप घेऊन व्हर्च्युअल क्लायंट मीटिंगमध्ये सहभागी होताना दिसली. हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर टॉक्सिक वर्कलाईफवर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली. .
X हँडल कर्नाटक पोर्टफोलिओद्वारे शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक त्याच्या लॅपटॉप आणि मोबाइल फोनवर काम करताना दिसत आहे. पण त्याच्या आजूबाजूचे लोक दुर्गापूजेच्या उत्सवाचा आनंद घेत आहेत. ती व्यक्ती आपल्या मोबाइल फोनव आणि लॅपटॉप वापरत असल्याचे दिसते.
“बंगळुरूमधील नवरात्रीच्या मंडळामध्ये असताना एक माणूस त्याच्या लॅपटॉप आणि फोनवर क्लायंट मीटिंगमध्ये सहभागी झालेला दिसत आहे. हा A Peak Bengaluru क्षण आहे. ही घटना शहराच्या वेगवान कार्य संस्कृतीला उत्तम प्रकारे अंतर्भूत करते, जिथे व्यावसायिक बांधिलकी आणि वैयक्तिक उत्सव यांचा समतोल साधणे हे सर्वसामान्य प्रमाण गोष्ट झाली आहे,” असे पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
या व्हिडीओला सध्या ९८,०९,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. ह व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “हा मूर्खपणा थांबवा, कंपनी नोकरीवरून काढून टाकण्यापूर्वीदोनदा विचार करणार नाही, म्हणून वैयक्तिक आणि व्यावसायिक वेळ वेगळा ठेवा.” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “हे वैयक्तित वेळेत काम करणे हे सामान्य गोष्ट आहे असे वागणे थांबले पाहिजे अन्यथा तणावामुळे सर्व तंत्रज्ञांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागेल. कधीकधी वैयक्तिक वेळ असणे आवश्यक आहे. ”
“हे त्याऐवजी ‘असंतुलित कार्य जीवन संतुलन’ संस्कृतीचे लक्षण आहे. दु:खद पण ते खरे आहे,” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.
अर्न्स्ट अँड यंग येथे काम करणाऱ्या २६ वर्षीय अण्णा सेबॅस्टियन पेरायल यांच्या दुःखद मृत्यूनंतर विषारी कार्यसंस्कृती आणि कार्य-जीवन संतुलन याविषयीचे संभाषण सोशल मीडियावर शिगेला पोहोचले. तिच्या पालकांनी आरोप केला आहे की, तिच्या नवीन नोकरीवर “कामाच्या प्रचंड दबावामुळे” तिच्या आरोग्यावर परिणाम झाला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. पण, बहुराष्ट्रीय कंपनीने आरोप फेटाळून लावले आणि म्हटले की पेरायल यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे काम देण्यात आले होते.