गेल्या एका दशकापासून महिलांनी खूप प्रगती केली आहे. एक काळ असा होता जेव्हा महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागत होता. आता पण आता महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. इतिहासातील धाडसी महिलांच्या संघर्ष आणि लढ्यासाठी जितके आभार व्यक्त करावे तितके कमी आहे. अजूनही समाजात स्त्री-पुरुष समानतेसाठी सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी धाडसी महिलांच्या संघर्षाच्या कथांमधून प्रेरणा घेतली पाहिजे. सोशल मीडियावर अशा अनेक कथा व्हायरल होत असतात ज्या महिलांच्या संघर्षावर प्रकाश टाकतात, ज्यांच्याकडून सर्वांना प्रेरणा मिळते. सध्या सोशल मीडियावर अशीच एक कथा चर्चेत आहे.
कोलकत्तामधील एका महिला उबेर चालक (Uber driver from Kolkata) दीप्ता घोष (Dipta Ghosh) हीच्या संघर्षाची कथा सर्वांना प्रेरणा देणारी आहे. फेसबूकवर परम कल्याण सिंह (Param Kalyan Singh) नावाच्या एका यूजरने या महिलेबाबत माहिती दिली आहे. महिला उबेर चालक पाहून थक्क झालेल्या परम सिंह यांनी आपला अनुभव सांगितला आहे.
महिला कार चालक पाहून थक्क झाला ग्राहक
आपला अनुभव सांगताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले,” काल मी एका मॉलमध्ये एका अॅपवरून कार बूक केली. एका महिला ड्राईव्हरचा फोन आला. हा आवाज ऐकून मी थक्क झालो कारण त्या महिलेने ड्रॉप लोकेशनबाबत विचारले नाही किंवा पेमेंट कॅश होईल की ऑनलाईन हे जाणून घेतले नाही.
कार चालक असलेल्या माहिलेचे शिक्षण ऐकून व्हाल थक्क
सिंहने पुढे सांगितले की, ”महिलेने पिकअप लोकेशनबाबत विनम्र पद्धतीने विचारले. अॅपवरील प्रोफाईलवर मिळालल्या माहितीनुसार या महिलेचे नाव होते दीप्ता घोष. प्रवास सुरू झाल्यानंतर मी त्या महिलेला विचारले तुमची भाषेची शैली सुशिक्षित व्यक्तीसारखी आहे तुमचे शिक्षण काय झाले आहे. उत्तर ऐकून मी थक्क झालो आणि तुम्ही लोक देखील व्हाल.”
हेही वाचा- कचऱ्यापासून असा तयार केला जातो कागद? कधी पाहिले नसेल तर हर्ष गोयंकाने शेअर केलेला व्हिडिओ पाहाच
इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक ग्रॅज्यूएट आहे महिला
दीप्ताने सिंह यांना दिलेल्या माहितीनुसार ती इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक ग्रॅज्यूएट आहे. तिने विविध कंपन्यांमध्ये ६ वर्षांपर्यंत काम केले आहे. तिच्या वडीलांचा २०२० मध्ये मृत्यू झाला त्यांच्या मागे तिच्या आई आणि लहान बहीणीची जबाबदारी तिच्यावर आली. तिला कोलकत्ताच्या बाहेर जावे लागू नये म्हणून तिने वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या केल्या.
हेही वाचा – आजपर्यंत शेवटचे असलेले उत्तराखंडमधील माणा गाव आता झाले पहिले, कसं ते जाणून घ्या
कुटुंबासाठी नोकरी सोडून झाली कॅब ड्राइव्हर
”आई आणि बहिणीला एकटे सोडून जायचे नव्हते म्हणून तिने व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याचा धाडसी निर्णय घेतला कारण तिला कार कशी चालवायची हे आधीच माहित होते. एक अल्टो खरेदी केली आणि२०२१ पासून उबेरसाठी कार चालवायला सुरुवात केली. ती आता या व्यवसायात खूप खूश आहे. सिंग यांनी कॅप्शनमध्ये सांगितले की, ”ती आठवड्यातून ६ दिवस दिवसाचे ६-७ तास ड्रायव्हिंग करून दरमहा सुमारे ४०,००० कमावते.”
सिंह यांच्या पोस्टला लोकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. लोकांनी दीप्ताचे कौतूक केले आणि तिच्या संघर्षाचे कौतूक केले.