निष्काळजीपणे वाहन चालवण्यामुळे रस्त्यावरती मोठंमोठे अपघात होणं आता सामान्य झालं आहे. वाहतूक विभागाकडून सांगितलेली नियमावली अनेक लोक पाळत नाहीत, त्यामुळेच अपघाताचा सामना करावा लागतो. शिवाय काही लोक तर दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवतात. अशा लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कडक कारवाई करते. पण तरीही काहीजण पोलिसांना न जुमानता दारु पिऊन वाहन चालवतात, अशा अनेक घटना आपण पाहत असतो. सध्या दारू पिऊन नव्हे तर दारु पित बाईक चालवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याचा हा अनोखा आणि धोकादायक स्टंट पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये, रस्ते अपघात टाळण्यासाठी मद्यपान करून वाहन चालविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण तरीही लोक दारु पिऊन वाहन चालवतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती एका धावत्या ट्रकमागे बाईक चालवत आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो बाईक चालवत असतानाच बिअर पिताना आणि सिगारेट ओढताना दिसत आहे.

Girl fell down of scooty on road funny video goes viral on social media
बापरे! स्कूटी चालवणाऱ्या महिलेनं अक्षरश: एका मागोमाग ४ गाड्यांना दिली धडक; VIDEO पाहून कपाळावर माराल हात
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Accident Viral Video
VIDEO : एक चूक अन् खेळ खल्लास! बाईक घसरली अन् तो सरळ ट्रकखाली गेला… पुढे जे घडलं, ते पाहून चुकेल काळजाचा ठोका
Punekar man wrote funny message in back of the tempo video goes viral on social media puneri pati
VIDEO: “ती वेडी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला?…” पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की पाहून रस्त्यानं सगळेच हसू लागले
VIDEO Viral: Drunk Youth Climbs Mobile Tower In Bhopal, Creates Ruckus video goes viral on social media
VIDEO: देशी दारु अशी चढली की…मद्यधुंद तरूणाचा मोबाईल टॉवरवर चढून धिंगाणा; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा
Accident video viral where Speedy Bus hit the man shocking video on social media
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; बसने दिली धडक, टायरखाली येणार इतक्यात…, पुढच्याच क्षणी काय झालं पाहा
Cab Driver Trending Video us rapper claims driver denied ride
“जाड असणं गुन्हा आहे का?” टॅक्सी चालकाने २२० किलो वजनाच्या महिलेबरोबर काय केलं एकदा पाहाच, VIDEO पाहून तुम्हीही व्यक्त कराल संताप
Father holds child with one hand while driving a bike with other shocking video viral on social media
“बापाची मजबुरी की मूर्खपणा?”, एका हातात झोपलेलं लेकरू तर दुसऱ्या हातात बाईक; VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

हेही पाहा- वंदे भारत एक्सप्रेस उंच घाटात पोहोचताच…, महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचा ट्रेन चालवतानाचा थरारक Video पाहाच

हायवेवर मद्यपान करत चालवतोय बाईक –

हेही पाहा- धावत्या कारमधून नोटांचा पाऊस; भररस्त्यावर पैसे फेकणाऱ्या तरुणाचा Video पाहून व्हाल थक्क

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील बाईकस्वाराच्या विचित्र आणि धोकादायक कृतीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. कारण हा बाईकस्वार हायवेवर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या मागे शिडीवर बिअरचा कॅन ठेवत आहे. शिवाय तो खूप वेगाने दुचाकी चालवताना सिगारेट पेटवतानाही दिसत आहे. नंतर तो बाईकचा वेग वाढवतो, ट्रकजवळ येतो, बिअरचा कॅन उचलतो आणि त्यातून दोन घोट पितो, हा धक्कादाय आणि जिवघेणा स्टंट पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे.

या व्यक्तीचा व्हिडीओ हायवेवरुन जात असलेल्या वाहनांमधील लोकांनी शूट केला आहे. अशा प्रकारे मद्यपान करून वाहन चालवणे हे अत्यंत धोकादायक असून अशा पद्धतीचं धाडस कोणीही करु नये असं आवाहन करण्यात येत आहे. शिवाय या व्हिडीओतील व्यक्तीचा थोडासा तोल गेला तरी त्याचा जीव गेला असता असं नेटकरी म्हणत आहेत.

Story img Loader