Heartwarming Video : आजकालच्या स्वार्थी जगात चांगली नि:स्वार्थी माणसं भेटली की, खरंच खूप आश्चर्य वाटतं. या जगात अजून चांगली माणसं शिल्लक आहेत याची प्रचिती आली होती. असं म्हणतात ना, जगात जशी वाईट माणसांची कमतरता नाही, त्याचप्रमाणे चांगल्या माणसांचीही कमी नाही. अनेक वेळा नकळत अशी काही चांगली माणसं भेटतात की, त्या लोकांचे आभार कसे मानायचे हेच समजत नाही. अमेरिकेतील मेन येथे राहणाऱ्या एमा ह्युजेस या तरुणीलाही असाच काहीसा अनुभव आला, तिनं तिच्याबरोबर घडलेल्या हृदयस्पर्शी घटनेचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे; जो पाहताना आपसूकच तुमच्याही चेहऱ्यावर हास्य खुलेल. त्या तरुणीनं सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
तरुणीचे कानातले शोधण्यासाठी रस्त्यावर जमली गर्दी
एमानं व्हिडीओमध्ये सांगितलं की, एका म्युझिक कॉन्सर्टमधून बाहेर पडताना तिच्याबरोबर असलेल्या एका मुलीचे कानातले वाटेत पडले. त्यानंतर तिथे उभ्या असलेल्या लोकांनी मुलीचे कानातले शोधण्यास सुरुवात केली. काही लोक रस्त्यावर वाकून मुलीच्या कानातले शोधत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तेव्हा व्हिडीओमध्ये एक माणूस आम्ही काय शोधत आहोत, असा सवाल करतो. त्यावर दुसरी व्यक्ती उत्तर देते की, आम्ही कानातले शोधत आहोत.
Read More Trending News : राहुल गांधींनी घरातील नव्या सदस्याबरोबरचे सुंदर Photo केले शेअर; म्हणाले, “आईची लाडकी…”
“माणुसकीवर विश्वास कसा नाही?”
व्हिडीओमध्ये एमा सांगते की, सध्या सुमारे १४-१५ लोक मुलीच्या कानातले शोधण्यात व्यग्र आहेत. कधी कधी मला माणसं खूप गोंडस वाटतात. त्यामुळे मी मानवतेवर विश्वास कसा ठेवू नको? व्हिडीओच्या शेवटी एमा म्हणते, “ठीक आहे. कानातले सापडले नाहीत; प, काही चांगले लोक नक्कीच भेटले आहेत आणि ही खूप मोठी गोष्ट आहे.”
एमाचा हा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा करोडो लोकांनी तो पाहिला आणि शेअर केला. या व्हिडीओला लाखो लोकांनी लाइक केले होते. त्याशिवाय हजारो लोकांनी व्हिडीओवर कमेंट्स केल्या आणि त्यांच्यासोबत असेच चांगले अनुभव शेअर केले.
© IE Online Media Services (P) Ltd