वाढतं वय थांबविणे आणि ऐन  पंन्नाशीच्या काळात सोळा वर्षांच्या तरुणीसारखं सुंदर दिसणं जवळपास अशक्य गोष्ट आहे. पण म्हणतात ना या जगात अशक्य असं काहीच नाही आणि हेच करुन दाखवलं ते इंडोनेशियामध्ये राहणाऱ्या या महिलेने. तिच्या दिसण्यावरून अनेकदा तिचं नेमकं वय काय याबद्दल अंदाज बांधणं अवघड जातं, कित्येक जण तिला कॉलेजमध्ये जाणारी तरुणी समजतात. तर अनेकदा ती आपल्या मुलांसोबत बाहेर गेली की त्यांची प्रेयसी समजण्याची गल्लत लोक करतात. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या या महिलेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे.

सौंदर्याने घात केला; अधिकाऱ्याने विमानतळावरच अडवले

तर या महिलेचं नाव आहे पुष्पा देवी. तिचं वय आहे ५० वर्षे, पण तिने स्वत:चं तारुण्य अजूनही जपलं आहे. ती व्यावसायिक आहे. अनेकदा ती इंडोनेशियामधील कार्यक्रम आणि चर्चासत्रामध्ये सहभागी होते, त्यामुळे एव्हाना ती सगळ्यांच्या परिचयाची झाली आहे. इन्स्टग्रामवर तिचे थोडेथोडके नाव्हे, तर तब्बल २ लाख ५० हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. पुष्पाला दोन मुलं आहेत. त्यांचं वय २० वर्षांहून अधिक आहे त्यामुळे जेव्हा पुष्पा आपल्या दोन मुलांसोबत बाहेर जाते त्यावेळी अनेक जण दोघांनाही प्रेमी युगुल समजण्याची चूक करतात. पण हे सारं मी खूप एन्जॉय करते असंही पुष्पा म्हणते. योग्य आहार, व्यायाम हे माझ्या तारुण्याचं रहस्य असल्याचं पुष्पा अभिमानाने सांगते.

‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ इफेक्ट : जंगलात हरवलेले आई आणि मुलगा १० दिवस जिवंत राहिले

वयामुळे लोकांना संभ्रमात पाडणारी ही काही पहिली महिला नाही. काही दिवासांपूर्वी न्यॅटली झेनकिव या गायिकेला तुर्की विमानतळावर थांबवून ठरण्यात आलं होतं. आपलं वय चाळीस असल्याचं तिने सांगितलं होतं, पण विमानतळावरचे अधिकारी मात्र तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते, कारण ती फक्त २१ वर्षांची दिसत होती.

Story img Loader