आजकाल सोशल मीडियावर ‘फ्युजन डिश’ हा एक नवीन फूड ट्रेंड बनला आहे. लोक रोज नवनवीन रेसिपी ट्राय करत आहेत. त्या सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. मॅगी हा अनेकांना आवडणारा पदार्थ आहे. सर्वाधिक प्रयोग तर मॅगीवर होताना दिसत आहेत. आतापर्यंत फंटा मॅगी, चॉकलेट मॅगी, पान मसाला मॅगी, रूह अफजा मॅगी असे मॅगीचे कितीतरी प्रकार सादर झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर ‘स्टिंग मॅगी’चा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड एनर्जी पेयासह बनवलेले मॅगी दाखवले आहे. एका ट्विटर यूजरने व्हिडीओ शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने व्हिडिओला ‘सर्व काही संपले, बाय बाय’. असे कॅप्शन दिले आहे. हा अजब पदार्थ पाहून खवय्ये मात्र फारच संतापले आहेत.

मॅगी हा अनेकांना आवडणारा पदार्थ आहे. या अजब रेसिपीचा व्हिडीओ @Highonpanipuri या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओतील व्यक्ती फ्राईंग पॅनमध्ये पाण्याऐवजी स्टिंग एनर्जी ड्रिंक ओततो आणि त्यामध्ये इन्स्टंट नूडल्स घालते. त्यानंतर त्यात मॅगी मॅजिक मसाला, कांदे आणि हिरव्या मिरच्या त्यात टाकल्या जातात. मॅगी शिजल्यानंतर एका वाटीमध्ये ग्राहकाला दिली जात आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल. मॅगीचा हा अनोखा अवतार पाहून खवय्ये प्रचंड भडकले आहेत.  स्टिंग मॅगीचा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास २७ हजार वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी विचित्र मॅगीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आता ही मॅगी फक्त व्हिडिओसाठी तयार केली आहे का हाही एक प्रश्न आहे.

( आणखी वाचा : Snake on Sun: अरे बापरे! सूर्याच्या आतमध्ये फिरतांना दिसला साप; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का!)

अनेक नेटकऱ्यांनी “मॅगीच्या आत्म्याला शांती मिळो, भूक भागवणाऱ्या मॅगीसोबत असे खेळ नका, मॅगी आता पहिल्यासारखी राहाणार नाही, इश्वरा असे नूडल्स खाण्यासाठी शक्ती द्या, अशा कमेंट्स करत काहींनी या मॅगीला ट्रोल केलं आहे.