वृत्त वाहिनीच्या लाईव्ह शोमध्ये पाहुणे म्हणून विश्लेषकांपासून ते सामान्य माणसे आलेले आपण अनेकदा पाहतो पण एका वृत्तनिवेदकाच्या लाईव्ह शोमध्ये चक्क मांजरच येऊन बसली. लाईव्ह शोमधला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तुर्कीमधल्या एका स्थानिक वृतवाहिनीच्या लाईव्ह शोचा आहे. तुर्कीमधल्या डेनिज्ली शहरात एका स्थानिक वृत्तवाहिनीवर सकाळी ‘गुड मॉर्निंग डेनिज्ली’ हा कार्यक्रम दाखवण्यात येतो. सकाळच्या ताज्या बातम्या आणि देशातील महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये काय छापून आले आहे हे या कार्यक्रमात दाखवले जाते. त्यामुळे स्टुडिओमधल्या मोठ्या बाकावर देशातील काही वृत्तपत्रे ठेवली होती तर दुसरीकडे वृत्त निवदेक लॅपटॉपवर काही महत्त्वाची बातमी प्रेक्षकांना वाचून दाखवत होता. हा कार्यक्रम सुरु असतानाचा अचानक एक मांजर या स्टुडिओत शिरते. इतकेच नाही तर ही मांजर त्यांनी ठेवलेल्या वर्तमान पत्रावर देखील फिरते. पण तरीही हा वृत्त निवेदक कार्यक्रम थांबवत नाही. काही वेळाने ही मांजर मात्र थेट त्याच्या लॅपटॉवरच जाऊन बसते. तेव्हा मात्र नाईलाजाने या निवेदकाला कार्यक्रम थांबवावा लागतो. कार्यक्रमाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर तूफान व्हायरल झाला आहे.

Story img Loader