Viral Video: आपल्यातील अनेक जण श्वानप्रेमी आहेत. श्वान हा सर्वात इमानदार प्राणी मानला जातो. पाळीव असो किंवा भटका श्वान हे प्राणी माणसांवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्याशी नेहमी निष्ठावान राहतात. तुम्ही फक्त एक दिवस प्रेमाने श्वानाला बिस्कीट खाऊ घाला. तो दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी तुमची आतुरतेने वाट पाहत असते. एकूणच माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसांशी नव्हे तर प्राण्यांशीसुद्धा नकळत नातेसंबंध जोडत असतो. तर आज सोशल मीडियावर याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. व्हायरल व्हिडीओत एका वर्तुळाकार लोखंडी रीलमध्ये श्वानाचे डोके अडकते. तेव्हा एक अज्ञात व्यक्ती मदतीस धावून येते.
व्हायरल व्हिडीओत श्वानाचे एका वर्तुळाकार लोखंडी रीलमध्ये श्वानाचे डोकं अडकलेलं दिसतं आहे. श्वान स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तडफडताना दिसत आहे. हे बघून एक अज्ञात व्यक्ती त्याच्या जवळ जाऊन बसते. नंतर तो कापडाचा तुकडा आणतो आणि श्वानाच्या तोंडाला घट्ट बांधून घेतो. नंतर व्यक्ती मागे जाऊन त्याच डोकं हळुवारपणे बाहेर काढण्याचा पर्यंत करताना दिसते. व्यक्ती सुखरूप श्वानाला बाहेर काढू शकला की, नाही हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा.
हेही वाचा…आईच्या मृत्यूनंतर पिल्लाचे स्थलांतर; आयएफएस अधिकाऱ्याकडून ‘असे’ सांत्वन, पाहा हृदयस्पर्शी पोस्ट…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, व्यक्ती श्वानाच्या तोंडाला कापडाच्या पट्टीने घट्ट बांधून ठेवते. जेणेकरून त्याला वेदना होणार नाहीत आणि हळुवारपणे त्याचे तोंड लोखंडी रीलमधून बाहेर निघेल. अनेक प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती श्वानाला लोखंडी रीलमधून यशस्वीरित्या बाहेर काढते. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर बांधलेली पट्टी सोडते आणि अशाप्रकारे श्वानाची सुटका होते. सुटका होताच श्वान तेथून पळ काढतो आणि व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ज़िन्दगी गुलज़ार है ! या पेजच्या @Gulzar_sahab या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘माणुसकी हृदयात असते, परिस्थिती नाही’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. कठीण परिस्थितीत केवळ मानवच नाही तर भटक्या प्राण्यांनासुद्धा भीती वाटते. मानवाप्रमाणे भटक्या प्राण्यांना सुद्धा मदतीची गरज असते. तसंच काहीस या व्हिडीओतही पाहायला मिळालं आहे. लोखंडी रीलमध्ये अडकलेल्या श्वान घाबरला असतो आणि मदतीसाठी वाट पाहत असतो. तितक्यात अज्ञात व्यक्ती येऊन त्याची मदत करून जाते.