Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ पाहून पोट धरून हसायला येते. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अशा घटना किंवा मजेशीर किस्से बघायला मिळतात की पाहून हसू आवरत नाही सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये दोन तरुण मुले टी-शर्ट विक्री करताना दिसत आहे पण त्यांची मार्केटिंग स्टाईल पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या व्हिडिओमध्ये ही तरुण मुले टी-शर्ट विक्री करताना लयबद्ध पद्धतीने दोसो दोसो ही किंमत सांगून आता टी-शर्ट घेऊन नाचताना दिसत आहे. या अनोख्या पद्धतीने बाजारातील ग्राहकांचे ते लक्ष वेधून घेत आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमच्यापैकी अनेक जण आवडीने स्ट्रीट शॉपिंग करत असेल. स्ट्रीट शॉपिंग करताना आपल्याला अनेकदा स्वस्त दरात चांगल्या वस्तू मिळतात. त्यामुळे अनेक जण स्ट्रीट शॉपिंगकडे वळतात. हे तरुण मुले स्ट्रीट शॉपिंग करू इच्छित ग्राहकांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन तरुणांनी मार्केटमधध्ये कपड्यांचा गाडा लावला आहे. या गाड्यावर कपड्यांचा ढिग दिसत आहे आणि दोन तरुण हातात कपडे घेऊन ‘दोसो दोसो’ म्हणत त्या तालावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून कोणालाही हसू येईल. त्या गाड्यावरील कपड्यांची किंमत दोनशे रुपये त्यामुळे ते जोरजोराने ‘दोसो दोसो’म्हणताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या तरुणांना असे नाचताना पाहून बाजारातील लोक त्यांच्याकडे बघून हसत आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

laddii_oyee007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फक्त २०० रुपये” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “हाउज द जोश” तर एका युजरने लिहिलेय, “वाह व्हिडीओ पाहून मजा आली” आणखी एका युजरने विचारलेय, “हा कपड्यांचा गाडा कुठे आहे?”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Street cloth vendors guys dance by saying price on rhythm watch marketing funny video goes viral on social media ndj