Amul Ice Cream Shocking Video : आईस्क्रीम म्हणजे अनेकांच्या आवडीचा पदार्थ. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आईस्क्रीमवर ताव मारताना दिसतात, त्यामुळे केवळ उन्हाळ्यातच नाही तर इतर सिझनमध्येही लोक आईस्क्रीम आवडीने खातात. सणासुदीला अनेकांच्या घरी रात्री जेवल्यानंतर आईस्क्रीम पार्टी रंगते. ग्राहकांची आवड लक्षात घेता हल्ली बाजारातही अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या आईस्क्रीम चाखायला मिळतात. पण, अशाच एका ब्रँडेड कंपनीच्या आईस्क्रीमच्या नावाखाली काही आईस्क्रीम विक्रेते ग्राहकांच्या जीवाशी खेळताना दिसतात. हे विक्रेते एक्सपायर आईस्क्रीम ग्राहकांना खायला घालतायत, पण ग्राहकांना त्याचा थांगपत्ताही नाही, त्यामुळे रस्त्यावरील हातगाडीवर जर तुम्ही आईस्क्रीम खात असाल, तर हा व्हिडीओ एकदा जरूर बघा. कारण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा कधीही हातगाडीवर विकली जाणारी ब्रँडेड कंपनीची आईस्क्रीम खाण्याची हिंमत करणार नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हातगाडीवर आईस्क्रीम खाणाऱ्यांनो ‘हा’ व्हिडीओ एकदा पाहाच

यापूर्वीदेखील अगदी गलिच्छ पद्धतीने आईस्क्रीम बनवून ते लोकांना विकल्याचे प्रकार समोर आले आहेत. इतकेच काय तर एका प्रकरणात चक्क आईस्क्रीममध्ये तुटलेले मानवी बोट आढळून आले होते, ज्यानंतर वारंवार अशा घटना समोर आल्या आहेत. अशात आता आईस्क्रीमचा नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात हातगाडीवर अमूल आईस्क्रीम विकणारे विक्रेते एक्सपायर आईस्क्रीमवरील तारीख काढून तिथे पुन्हा नवीन तारीख टाकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ दिल्लीतील असल्याचे सांगितले जात आहे.

अमूल आईस्क्रीमच्या नावाखाली खाताय तुम्ही एक्सपायर आईस्क्रीम

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, रस्त्याला लागून असलेल्या एका गल्लीत अनेक अमूल आईस्क्रीमच्या छोट्या हातगाड्या उभ्या आहेत. यावेळी एक व्यक्ती कॅमेरा ऑन करून त्या गल्लीत शिरतो, तेव्हा तिथे दोन तरुण थिनरच्या मदतीने अमूल आईस्क्रीमच्या एक्सपायर आईस्क्रीमवरील तारीख पुसत आहेत. तसेच तिथे पुढे नवीन तारीख टाकण्यासाठी काही मशीन्स ठेवल्या आहेत. अशाप्रकारे एक्सपायर आईस्क्रीमवरील तारीख पुसून पुन्हा त्यावर नवीन तारीख टाकत आईस्क्रीम ग्राहकांना विकल्या जातात, त्यामुळे अशा हातगाड्यांवर आईस्क्रीम खाताना १०० वेळा विचार करा. यावरून लोकांच्या आरोग्याशी कशाप्रकारे खेळ सुरू आहे हे दिसतेय.

हॉटेल, रेस्टॉरंटमधील लोणचं आवडीनं खाताय? मग ‘हा’ Video पाहाच; तुम्हालाही वाटेल किळस

अमूल आईस्क्रीमच्या विकली जातेय एक्सपायर आईस्क्रीम

अशा प्रकारच्या आईस्क्रीम तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतात, त्यामुळे यापुढे अशा विक्रेत्यांकडून आईस्क्रीम घेताना जरा विचार करा. या संतापजनक प्रकाराचा हा व्हिडीओ kamal.raj.arora नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे. पण, या प्रकारावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Street vendors selling expire amul ice cream to consumers shocking disgust video viral sjr