ऑफिसच्या ठिकाणी अनेकवेळा महिलांना वेगळ्या अडचणींचा आणि मनस्तापांचा सामना करावा लगतो. सतत अपमान आणि विकृत नजरेच्या कैदत ती अडकलेली असते. इथून तिची सुटका नसते. तिने काय घातलंय पासून ती कशी दिसतेय आणि त्यातूनही ‘काय दिसतंय’ हे पाहणारी विकृत नजर तिचा आत्मविश्वास अनेकदा पोखरून काढत असते. खाली वाकताना, चालताना, मागून, पुढून या विकृत नजरा तिची चाचपणी करत असतात. हे लंपट कधी कधी मनात यापुढचाही विचार करून झालेले असतात. तिला काय वाटेल, तिची मनस्थिती काय होईल याची जराही पर्वा न करता तिला नको तिथे स्पर्श करणे, अश्लिल शेरेबाजी करणे अशा कितीतरी प्रसंगाचा तिला सामना करावा लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कधी कधी पोटापाण्याचा प्रश्न म्हणून ती गप्प बसते, तर कधी लोक आपल्यालाच दोष देतील हा विचार तिला आणखी खचवतो. हा सारा तमाशा सगळेच पाहत असतात पण तिच्याबाजूने, तिच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका फार कमी लोक घेतात, पण यातूनही एखादी दुर्गा असतेच. जी अशा लंपट माणसांना धडा शिकवते, ‘माझ्या कडे डोळे वटारून का बघतो?’, ‘माझ्या परवानगीशिवाय मला स्पर्श करण्याची हिंमत का करतोस?’ असं विचारण्याचे धाडस ठेवते. म्हणूनच तिच्यातल्या स्त्री शक्तीला सलाम करणारा एक व्हिडिओ बॉम्बे डायरीने पोस्ट केला आहे. ‘Let The Voice Be Yours’ नावाचा हा व्हिडिओ प्रत्येकाने बघायलाच हवा. ३ मिनिटांच्या या व्हिडिओत कामाच्या ठिकाणी महिलांचा कसा लैगिंक छळ केला जातो आणि आपल्या सहका-याला ती कसा धडा शिकवते यावर तो आधारलेला आहे. तेव्हा यापुढे अशा प्रसंगाच्या वेळी खचून जाऊ नका, उठा आणि लढायला शिका.