Viral Video of Sea Wave : पावसाळ्यात समुद्रकिनारी जाणे अत्यंत धोक्याचे असते कारण या काळात समुद्र खवळलेला असतो. पाऊस आणि नद्याच्या पाण्यामुळे समुद्राची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. समुद्राची लाट आली की सार काही घेऊन जाते. समुद्राच्या उसळत्या लाटांसमोर कोणीही टिकू शकत नाही. म्हणूनच पावसाळ्यात समुद्रकिनारी जाऊ नये असे आवाहन लोकांना केले जाते. तरीही लोक स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालतात. समुद्राच्या लाटेसह अनेकजणा वाहून जातात. अशा अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत असतात. सध्या असाच एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या अंगावर काटा निर्माण होईल.
समुद्रकिनारी लाटांपासून दूर राहा
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की एक चिमुकली समुद्राच्या लाटांचा आनंद घेताना दिसत आहे. तिची आई मोबाईलवर व्हिडिओ शुट करत असल्याचे दिसते. अचानक मोठी लाट येते आणि दोघीही पाण्यामध्ये पडतात. हे सर्व दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. मोबाईलमध्ये माय-लेकीचा फक्त आरडा-ओरडा ऐकून येतो. मोबाईल देखील पाण्याखाली जातो. महिलेच्या मदतीला तेथील लोक धावून येतात. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही पण मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या पालकांवर सोशल मीडियावर खूप टिका केली जात आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – प्रवासादरम्यान गाडी चालवताना अचानक वादळ आल्यास काय कराल? ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी
हेही वाचा – ‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ साचलेल्या पाण्यातून वाहन चालवताना तुमची एक चूक बेतू शकते इतरांच्या जीवावर
आयुष्याबरोबर खेळू नका!
gktrickindiaनावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करतना कॅप्शनमध्ये लिहेल आहे की. लोक रील बनवण्याच्या नादात वेडे झाले आहेत. तसेच व्हिडीओवर मजकूर दिसत आहे त्यामध्ये लिहिले आहे की, आयुष्याबरोबर खेळू नका! आयुष्य अत्यंत किंमती आहे. त्यानंतर चिमुकलीची चूक होती की पालकांची असा प्रश्न विचारला आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी पालकांना दोष दिला आहे. एकाने लिहिले की,” वाहत्या पाण्याबरोबर कधीही मस्ती करू नका” दुसरा म्हणाला,” किती धोका पत्करतात हे लोक” तिसरा म्हणाला की, आजकाल प्रत्येकजण मॉडर्न होण्याच्या आपल्या आई-वडिलांच्या प्रयत्न करण्यात इतका गुंतला आहे की काय बरोबर काय चूक आणि पुढे काय होणार याचा विचारच करायचा नाही. आई म्हणतेय की, मुलगी ये पण ती तिला घ्यायला गेली नाही. कशी आई आहे , ती बाई स्वत:समोर उभी आहे.”
हेही वाचा –“जपून जा रे, पुढे धोका आहे!”, धबधब्यावर भिजताना तरुण दगडांवरून घसरला अन् थेट खाली…. Video Viral
व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटते, चूक कोणाची आहे?