सोशल मीडियावर अनेक भावूक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर दिसत असतात. काही व्हिडीओ पाहून असे कुणाच्याही आयुष्यात घडू नये, असे वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती अवजड पोतं खांद्यावरुन वाहून नेताना दिसत आहे. आजोबांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
असं म्हणतात, संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. मरेपर्यंत संघर्ष चालूच असतो. आजोबांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल की पोट भरण्यासाठी माणसाला किती संघर्ष करावा लागतो. ज्या वयात या आजोबांनी आराम करायला पाहिजे. त्या वयात त्यांना एवढं राबावं लागत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आजोबा ज्यांचे वय अंदाजे ८० च्या वर असेल ते त्यांच्या पाठीवर अवजड पोतं वाहून नेताना दिसत आहे. या उतार वयात त्यांना नीट उभे सुद्धा राहता येत नाही, पण ते वजनी पोतं पाठीवर उचलताना दिसत आहे. त्यांनी या पोत्याला दोरी बांधली आहे आणि दोरीच्या साहाय्याने ते पोतं वाहून नेताना दिसत आहे. आजोबांच्या चेहऱ्यावर प्रचंड अशक्तपणा जाणवतोय. हा व्हिडीओ पाहून कोणालाही त्यांची अवस्था पाहून वाईट वाटेल.
हेही वाचा : निसर्गाची किमया! चक्क झाडाच्या खाली दडलेली आहे ही रहस्यमय गुहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
fazlimaula999 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वडील”. हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी हा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीलाच चांगले सुनावले आहे. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ रेकॉर्ड करण्यापेक्षा त्या वृद्ध व्यक्तीला मदत करायला पाहिजे होती.” तर काही युजर्स हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. एका युजरने लिहिलेय, “माझ्याकडे शब्द नाही.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून मला रडू आले” अनेक युजर्सनी या आजोबांवर देवाची कृपा होवो, ही प्रार्थना केली आहे. काही युजर्सनी असे दिवस कोणाच्याही जीवनात येऊ नये, असे म्हटले आहे.