शिक्षण ही मूलभूत गरज आहे. शिक्षण महत्त्वाचे आहे कारण ते जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि विचार क्षमता असलेल्या व्यक्तींना सक्षम करते. त्याबरोबर शिक्षणामुळे व्यक्ती त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यास, आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत करते. गरिबीच्या दुष्ट चक्रात सापडलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते. शिक्षणामुळे कोणत्याही व्यक्तीला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि त्यांच्या समाजाच्या विकासामध्ये अर्थपूर्ण योगदान देण्यास मदत करत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले तरी अजूनही ग्रामीण भाग किंवा दुर्लक्षित प्रदेशामधील लोकांना हक्काचे शिक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पण ज्यांना शिक्षणाची आवड आहे ते काहीही करून शिक्षण मिळवतात. कितीही संघर्ष करावा लागला तरी ते हार मानत नाही. अशाच काही चिमुकल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शहरातील मुलांना शाळेत जाण्यासाठी स्कूल बस असते पण ग्रामीण भागात असे काही नसते. शाळेत जाण्यासाठी मुलांना आजही शेजारच्या गावात पायी जावं लागते. कोणी नदी ओलांडून शाळेत जातात तर कोणी डोंगर दऱ्या सर करून शाळेत जातात. शाळेत जाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तरुणांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर होत असतात. अशाच एका व्हायरल व्हिडीओमध्ये एका सायकलवर तीन लहान मुलं शाळेत जाताना दिसत आहे. त्यापैकी दोन छोटी मुले साधारण पहिलीत असावी जे सायकलच्या मागे एकमेकांना पकडून बसलेले दिसत आहे. तर त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असलेला मुलगा सायकल चालवत आहे. त्याच्यापेक्षा त्याच्या सायकलची उंची जास्त आहे असे असतानाही सायकलच्या पाईपमधून तिरका पाय टाकून तो सायकल चालवत आहे. चिमुकल्याचां हा संघर्ष पाहून नेटकरी भावून झाले आहेत. अनेकांना आपल्या शाळेचे दिवस आठवत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bike caught a fire alive man burnt in fire viral video on social media
VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप
child fell down from the scooter while his mother was driving it viral video on social media
आईची एक चूक पडली महागात! स्कूटर चालवताना चिमुकला रस्त्यावर पडला अन्…, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का
The little boy was studying in the light of the street lamps
याला म्हणतात चांगले कर्म! रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करत होता चिमुकला, इन्फ्लुअन्सर तरुणाने केले असं काही… VIDEO एकदा पाहाच
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

हेही वाचा – Video : किळसवाणा प्रकार! इन्फ्लुएंसरने फेस मास्क म्हणून तोंडाला लावली ‘मानवी विष्ठा’, नेटकरी म्हणे, “लाज वाटली पाहिजे”

छत्तीसगढच्या नक्षलग्रस्त भागातील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये lay_bhari_official नावाच्या पेजरवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “शिकण्याची जिद्द हवी, मग अशक्य गोष्टी शक्य होतात !”

हेही वाचा – “हा पाय शेणाचा, हा पाय मेणाचा”, स्मिता पाटीलच्या गाण्यावर तरुणीने सादर केलं सुंदर आदिवासी नृत्य, Viral Video एकदा बघाच

व्हिडीओवरही मजकूर लिहिलेला दिसत आहे ज्यामध्ये लिहिले आहे की, शिक्षणाची ओढ असली की माणूस कसाही शिकतो. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, “नशीब रस्ते चांगले आहेत. महाराष्ट्रातील पोरं चिखल तुडवून जातात शाळेत. खूप शिका बाळांनो”

दुसरा म्हणाला, मला ही माझे दिवस आठवल मी पण असंच मधे पाय घालून सायकल चालवत होतो”

तिसरा म्हणाला, “खूप छान ईश्वर तुमच्या कष्टाला फळ देवो”

चौथा म्हणाला की, “मोठा भाऊ नेहमी आधार देतो.”