Video viral on social media: शाळा-कॉलेजांमध्ये मुला-मुलींमध्ये भांडणे होत असतात. अनेक वेळा मुलं हिंसक होतात आणि एकमेकांवर हल्लाही करतात. या सगळ्यात शाळा किंवा शाळेतील शिक्षक हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका भांडणात एका शाळेतील शिक्षिकेने मध्यस्ती करत भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र हेच त्यांच्या अंगलट आलं. कारण एका विद्यार्थींनीनं चक्क लोखंडी खुर्चीच शिक्षिकेच्या डोक्यात मारली. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोखंडी खुर्ची उचलून फेकून मारली

buldhana students hospitalized loksatta
बुलढाणा : शेगाव गतिमंद विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; एकाचा मृत्यू
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Noida suicide case
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विद्यार्थ्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला अटक; जुळवून घेण्यास दिलेला नकार
Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
8 year girl dies due to Attack
Heart Attack : धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना कोसळली; कुठे घडली घटना?

खरं तर, २८ सप्टेंबर अमेरिकेतील साउथवेस्टर्न क्लासिकल अकादमीमध्ये दोन विद्यार्थिनींमध्ये जोरदार वाद झाला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोघीही एकमेकींच्या अंगावर धावून जात आहेत. यावेळी दोघींच्या मध्ये उभी असलेली महिला शिक्षिका दोघांनाही समजावण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र दोन मुलींपैकी एक मुलगी अचानक आरडाओरडा करत हिंसक बनते आणि वर्गात ठेवलेली लोखंडी खुर्ची उचलून दुसऱ्या मुलीवर फेकते. मात्र ही खुर्ची मध्येच उभ्या असलेल्या शिक्षिकेच्या डोक्याला लागते आणि त्या तिथेच पडतात. काही सेकंदांपर्यंत शिक्षिका पूर्णपणे बेशुद्ध झाल्या. यानंतर गंभीर गोष्ट म्हणजे शिक्षीका गंभीर जखमी असूनही मुली एकमेकींशी भांडतच आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ‘आता देवच मला वाचवेल’, म्हणत व्यक्तीने थेट सिंहांच्या पिंजऱ्यात मारली उडी; खेचला सिंहाचा कान अन् पुढच्या क्षणी…

गंभीर अवस्थेत शिक्षक रुग्णालयात दाखल

त्यानंतर गंभीर अवस्थेत शिक्षिकेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शाळेच्या मुख्यध्यापकांनी या मुलींच्या पालकांना कळवले आहे. या भांडणात एक कर्मचारीदेखील गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये विद्यार्थींनींना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल की शाळेतून काढून टाकले जाईल हे सध्या स्पष्ट झालेले नाही. दरम्यान यानंतर शाळेने पालकांना आश्वासन दिले आहे की ते या बाबी गांभीर्याने घेतात, आणि शाळेत सुरक्षित आणि पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.

Story img Loader