सोशल मीडियावर नोकरी संदर्भातील अनेक ट्विट व्हायरल होत असतात. कधी कोणी एखाद्या नोकरीसाठी अर्ज करतो किंवा हटके पद्धतीने राजीनामा देतो तर कधी कोणाला अफलातून नोकरीची ऑफर मिळते तर कधी नोकरीसाठी नकार मिळतो तेव्हा सोशल मीडियावर त्याची चर्चा होत असते. सध्या असाच एक प्रकार एका तरुणाबरोबर घडला आहे. या तरुणाने एका नामवंत कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता, त्याला एक नोकरीची ऑफर देखील मिळाली पण…ही ऑफर त्याला अपेक्षित नोकरीसाठी नव्हती. तरुणाने याबाबतचे ट्विट केल्यानंतर कंपनीच्या फाउंडरने थेट त्याला उत्तर दिले आहे.

मुंबईतील यश आचार्य या तरुणाने लोकप्रिय किराणा डिलिव्हरी अ‍ॅप झेप्टो येथे प्रॉडक्ट डिझायनरसाठी अर्ज केला होता. पण त्याच्यासोबत अनपेक्षित गोष्ट घडली. आचार्य यांने त्यांचा हा अनुभव X (पूर्वीचे Twitter) वर शेअर केला आहे. त्याने सांगितले की, त्यांला Zepto कडून एक अनपेक्षित ईमेल मिळाला. पण एका ट्विटस्टमुळे ही गोष्ट उल्लेखनीय ठरली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आचार्यांच्या पोस्टमुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली. एवढचं नव्हे तर या ट्विट झेप्टोच्या फांउडरचेही लक्ष वेधून घेतले.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
school students ai education
नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?

आचार्य याला झेप्टोकडून मिळालेल्या ईमेलचा स्क्रीनशॉट पोस्ट केला. ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, “झेप्टोमधील या डिलिव्हरी बॉय (मुंबई) भूमिकेसाठी तुम्ही योग्य आहात.” आचार्य यांनी या ट्विटमध्ये लिहिले की, “पण मी प्रोडक्ट डिझायनरसाठी अर्ज केला होता.”

हेही वाचा – मुंबईच्या रिक्षावाल्यांची बंगळुरुच्या रिक्षाचालकांबरोबर केली तुलना; म्हणे, ”UPI पेमेंटसुध्दा घेत नाही”

झेप्टोचे २० वर्षीय को -फाउंडर आणि सीटीओ कैवल्य वोहरा प्रतिसाद देतील याची आचार्य यांना फारशी अपेक्षा नव्हती. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२२ मध्ये सर्वात तरुण भारतीय अब्जाधीश बनलेले वोहरा, आचार्य यांच्याशी संपर्क साधला आणि म्हणाले, “हाय, तुमचे ट्विट पाहिले. तुम्ही रेझ्युमे/पोर्टफोलिओ पाठवू शकता का?”

हेही वाचा – पुणे तिथे…” चांदणी चौकातून कुठे आणि कसे जायचे याचे मिळणार क्लासेस? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य

आचार्यच्या ट्विटला थेट झेप्टोच्या को- फाउंडर वोहराने प्रतिसाद दिल्यामुळे तो चर्चेत आला आहे. आचार्यला झेप्टोमध्ये नोकरी मिळवण्याची पुन्हा एक संधी मिळाली आहे.

Story img Loader