Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने व्हिडीओ शेअर करत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात तर काही व्हिडीओ मजेशीर असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. देशभरात सध्या प्रचंड थंडी पडली आहे. काही ठिकाणी तर तापमान शून्याच्याही खाली गेलय. भर दुपारी रस्त्यावर धुकं पडलेलं दिसतेय. अशा कडाक्याच्या थंडीमध्ये अंघोळ करणं हे एक मोठं आव्हानच आहे. यावेळी लोक वेगवेगळे जुगाड करताना दिसतात, अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हो कारण या विद्यार्थ्यांनं शिक्षक शिकवत असताना चक्क वर्गातच अंघोळ केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडा अटलांटिक यूनिवर्सिटीत घडला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्ग भरलेला आहे. शिक्षकही वर्गात शिकवत आहेत. मात्र याच वर्गात सर्वात मागे एक विद्यार्थी अक्षरश: कपडे काढून अंघोळ करत आहे.  बरं, एवढंच नाही तर अंघोळ करताना तो शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देतोय. “मला विश्वास बसत नाहिये शिक्षकांनी मला भर वर्गात अंघोळ करण्याची परवानगी दिली.” अशा आशयाचं कॅप्शन या व्हिडीओवर देण्यात आलं आहे.

"Black Or White, Virgin Or Not": Bengaluru Auto's Gender Equality bengaluru auto driver written a message on back side of his auto goes viral
“महिला ही व्हर्जीन…” रिक्षा चालकानं रिक्षाच्या मागे लिहला विचित्र मेसेज; PHOTO पाहून तुम्हीच सांगा तुम्हाला हे पटलं का?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Student told Hilarious Math Full Form funny Answer
MATHS चा फुल फॉर्म माहितेय? विद्यार्थ्याने दिले भन्नाट उत्तर, पाहा Viral Video
Zilla Parishad school Viral Video
“इथे शिक्षणावर प्रेम केलं जातं…” जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी नाचत नाचत गायलं पावसाचं गाणं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक
43 students mexico protest
‘त्या’ ४३ विद्यार्थ्यांसाठी मेक्सिको का पेटलंय? २०१४ मध्ये बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर नक्की काय घडलं?
teacher, teacher latest news, Wardha,
‘तुमचे नुकसान भरून काढू, पण एक दिवस सुट्टी घेऊ द्या’, शिक्षक करताहेत विनंती
How to prepare for JEE Main 2025
JEE Main 2025 परीक्षेचा विद्यार्थ्यांनी घरबसल्या अभ्यास कसा करावा?
The impact of generative AI on education
शिक्षणावर जनरेटिव्ह एआयचा प्रभाव

व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, इतर विद्यार्थी शिक्षकांकडे लक्ष द्यायचं सोडून या तरुणाकडेच पाहत आहे. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> चुके काळजाचा ठोका…; तरुणांनी चक्क झाडाला दुचाकी बांधून खेळला झोका; VIDEO पाहून व्हाल अवाक्…

हा व्हिडीओ अंघोळ करणाऱ्या मुलानंच सोशल मीडियावर त्याच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हा नक्की काय प्रकार आहे हेच कळलं नाहीये. त्यामुळे नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हंटलं आहे नक्की काय चालंलय हे? तर दुसरा युजर म्हणतो, एवढ्या मोठ्या यूनिवर्सिटीत हे असले प्रकार..तर आणखी एका युजर म्हणतो यामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय.