करोना व्हायरससाठी चीनकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. असं असताना चायनीज खाद्यपदार्थाबाबत एक प्रकरण समोर आले असून त्यात एका विद्यार्थ्याचे दोन्ही पाय आणि बोटे कापावी लागली आहेत. १९ वर्षीय विद्यार्थ्याला रेस्टॉरंटमधून मागवलेले चायनीज पदार्थ खाल्ल्यानंतर काही तासातच दोन्ही पाय आणि बोटं गमवावी लागली. अहवालानुसार पहिले २० तास रुग्ण बरा होता, पण नंतर त्याला ओटीपोटात दुखू लागले. त्याच्या अंगाचा रंग बदलू लागला.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये शिकत असलेल्या जेसी नावाच्या विद्यार्थ्याने रेस्टॉरंटमधून जेवण मागवले होते. मात्र मागवलेले अन्न त्या दिवशी न खाता दुसऱ्या दिवशी खाल्ले. त्यामुळे खाण्यात सेप्सिस आणि गॅंग्रीनचे बॅक्टेरियाचे प्रमाण वाढले होते. हे अन्न खाल्ल्यानंतर विद्यार्थ्याची प्रकृती खालावली आणि तातडीने बोस्टनमधील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. न्यूयॉर्क पोस्टनुसार, चायनीज दुकानातून उरलेले अन्न खाल्ल्यानंतर त्याला थंडी वाजणे, धाप लागणे, डोकेदुखी, अंधुक दृष्टी आणि छातीत दुखू लागले. रुग्णाच्या एका मित्राने सांगितले की, त्याची त्वचा काळी निळी होऊ लागली होती. विशेष म्हणजे सेप्सिसचा संसर्ग त्याच्या शरीरात पसरला होता. रक्त आणि लघवीच्या चाचण्यांवरून असे दिसून आले की रुग्णाला निसेरिया मेनिन्जिटायडिस नावाच्या बॅक्टेरियाचा संसर्ग झाला आहे. त्यात सेप्सिसचे देखील निदान झाले. त्या संसर्गामुळे त्याला गॅंग्रीन देखील झालं. तरुणाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याची सर्व बोटे आणि दोन्ही पाय कापावे लागले.
१६ वर्षांपूर्वी रुग्णालयातून नवजात बाळ गेलं होतं चोरीला, असं शोधलं आई वडिलांनी आपल्या मुलाला
बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे जेसीची किडनी निकामी झाल्याचे तपासात समोर आले आहे. याशिवाय त्याचे रक्तच्या गुठल्या होऊ लागल्या होत्या. सेप्सिसचा संसर्ग त्याच्या शरीरात पसरला होता. उपचारादरम्यान विद्यार्थी तब्बल २६ दिवस बेशुद्ध पडला होता. अनेकदा आपण अन्न खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो. मात्र त्यामध्ये बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीव विकसित होऊ लागतात. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.