सोशल मीडियावर अनेकदा वहीच्या एखाद्या पानावर किंवा उत्तरपत्रिकेत लिहीलेल्या वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. यामध्ये कधी गाणी लिहीली जातात तर कधी आणखी काही. आता या सगळ्या गोष्टींमध्ये कितपत तथ्य असते माहित नाही पण उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये एका विद्यार्थ्याने परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेत आपली प्रेमकथा लिहीली आहे. एका जिल्हापरिषदेच्या शाळेत ही घटना नुकतीच घडली आहे. ”आय लव्ह माय पूजा” असं या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत मोठ्या अक्षरात लिहीले आहे. त्याच्या बाजूला एक बदाम आणि त्यामध्ये बाण काढत त्याने आपले हे प्रेम व्यक्त केले आहे. याच्याही पुढे जात त्याने पेपर तपासनीसासाठी काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यामद्ये ‘ये मोहब्बद भी क्या चिज है, ना जिने देती है ना मरने… सर इस लव्ह स्टोरीने पढाई से दूर कर दिया वरना…’ असं या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं आहे. त्यामुळे अभ्यासाचा आपल्या प्रेमप्रकरणावर होणारा परिणाम आणि त्याचे होत असलेले दुख: या शिक्षकांना कळावे अशी त्याची अपेक्षा असल्याचा तर्क काढला जात आहे. विशेष बाब म्हणजे असे सगळे उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर केले तर एखादवेळी आपण समजू शकतो. पण या विद्यार्थ्याने पहिल्याच पानावर विद्यार्थ्याने या प्रेमाच्या ओळी लिहून पेपर तपासनिसांना धक्का देण्याचे ठरवले आहे. बाकी संपूर्ण उत्तरपत्रिका कोरी सोडली आहे.

शाळेचे निरिक्षक मुनेश कुमार याबाबत म्हणाले, काही मुलांनी उत्तरपत्रिकेवर नोटा स्टेपलर करून दिल्या. तसंच काही उत्तरपत्रिकांवर विचित्र मेसेजही लिहिण्यात आले आहे. ‘सरांना पेपर उघडण्याआधी नमस्कार. सर पास करून टाका, असे मेसेज विद्यार्थ्यांनी लिहिले आहेत. काही विद्यार्थ्यांनी भावूक मेसेज तर काहींनी धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मला आई नाहीये. मी नापास झालो तर वडिल मला मारून टाकतील’, ‘नापास केलं तर मी आत्महत्या करीन’, असंही विद्यार्थ्यांनी लिहील्याचं या शिक्षकांनी सांगितलं. मात्र या विद्यार्थ्याने लिहीलेले प्रेमपत्र वेगळे सगळ्यांहून वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले.