परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणारे विद्यार्थी परीक्षागृहात गेल्यावर टेंशनमध्ये असतात. कारण प्रश्नपत्रिकेत नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले आहेत, असं टेंशन विद्यार्थ्यांना सतावत असतं. पण एका इंटरमीडिएट परीक्षेत काहीसं वेगळं घडलं. बिहारमधील एक विद्यार्थी इंटरमीडिएट परीक्षा देण्यासाठी परीक्षागृहात पोहोचला अन् चक्कर येऊन खाली पडला. त्यामागचं कारणही भन्नाट आहे. गणिताची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या या मुलाने ५०० मुलींमध्ये आपण एकटाच मुलगा असल्याचं दृष्य पाहिलं. मनिष शंकर प्रसाद (१७) असं या मुलाचं नावं आहे. परीक्षागृहातील ते दृष्य पाहून मनिषला धक्का बसला आणि त्याची प्रकृती बिघडली. एव्हढच नव्हे, तर डोकेदुखी आणि तापाचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in