आई-वडिलांसारखेच शिक्षक हे आपल्या गुरुस्थानी असतात. शिक्षक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवतात. काय चूक काय बरोबर हे शिकवण्याबरोबरच आयुष्याची गणितं कशी सोडवायची ते शिकवतात. ज्ञानाचा सागर असलेले आपले शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर दर दिवसाला अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतापर्यंत आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवतानाचे, मुलांना डान्स शिकवण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिलेच असतील. सध्या असाच एक विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात विद्यार्थ्याने शिक्षकांना असं सरप्राईज दिलं की ते पाहून शिक्षक अगदी खूशच झाले.

विद्यार्थ्याचं शिक्षकांना खास सरप्राईज

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका शाळेत विद्यार्थी बेंचवर वर्गात बसलेले दिसतायत. तेवढ्यात एक विद्यार्थी शिक्षकांना बोलावतो आणि त्यांना एक सरप्राईज देत गिफ्ट देतो. ते गिफ्ट पाहून शिक्षक आश्चर्यचकित होतात. त्या गिफ्टमध्ये एक फोटो फ्रेम असते, ज्यात त्यांचं स्केच असतं. स्केच पाहून ते खूप आनंदी होतात आणि भावूक होतात. ते गिफ्ट ते संपूर्ण वर्गाला दाखवतात.

व्हायरल व्हिडीओ @may_marathi_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “विद्यार्थ्याने दिलेले खास गिफ्ट पाहून शिक्षक झाले भावूक” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल तीन मिलियन व्हयुज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “शिक्षकांसाठी हे सुंदर क्षण आहेत.” तर दुसऱ्याने “आपल्या आई-वडिलांनंतरचे आपले पालक असतील तर ते शिक्षक” अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत लिहिलं, “शिक्षकाच्या चेहऱ्यावर हास्य आणणे म्हणजेच विद्यार्थ्याची देणगी.”