Student pant slip video: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इतकी मजेशीर असतात की त्यांना पाहून हसू आवरत नाही. तर काही व्हिडीओ भावनिक असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून नक्कीच तुमचा हशा पिकेल. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी आपल्या मॅडमच्या शेजारी उभा राहून एक कविता गात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा विद्यार्थी स्टेजवर उभा राहून ‘मछली जल की राणी है’ ही कविता गात असतानाच असे काही होते की, त्यानंतर सर्वजण हसू लागतात. कारण, हा मुलगा कविता गात असताना त्याची पँट अचानक निसटते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

( हे ही वाचा:दीदीची स्कुटी एन्ट्री एकदम जोमात! पार्क केलेल्या भल्यामोठ्या ट्रकमध्ये गाडी घेऊन अशी काही घुसली की.. पाहा Viral Video)

व्हिडिओ पाहून तुमचे हसू आवरणार नाही

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा हाफ पँट आणि हाफ टी-शर्ट म्हणजेच शाळेचा गणवेश घालून स्टेजवर पोहोचतो. त्या मुलाच्या शेजारी मॅडम देखील उभ्या असलेल्या दिसत आहेत. स्टेजवर जाऊन हा विद्यार्थी कविता बोलू लागतो. हातात माईक घेऊन विद्यार्थी ‘मछली जल की राणी है’ ही कविता गाण्यास सुरुवात करतो आणि तितक्यात त्याची पँट निसटते. हे पाहून तेथे उपस्थित सर्वांमध्ये एकच हशा पिकतो.

हा व्हायरल व्हिडिओ butterfly_mahi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूव्ज मिळाले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ एखाद्या शाळेतील कार्यक्रमा दरम्यान असल्याचं बोललं जात आहे. अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसंच अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student pant slip while speaking poem on stage video goes viral on social media gps