Student proposed teacher during online class viral video: शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं गुरू-शिष्याप्रमाणे असतं. शिक्षकाकडून मिळालेली विद्येची शिदोरी आयुष्यभर जोपासण हे खरंतर विद्यार्थ्याचं काम. लहानपणी अनेकांनी शिक्षकांचा ओरडा खाल्ला असेल, मार खाल्ला असेल; पण कधीही शिक्षकांचा अनादर करणं आपल्याला शिकवलं जात नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परंतु, काही जण फक्त मजेसाठी शिक्षकांचा अनादर करू लागले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात ऑनलाइन क्लासदरम्यान एक विद्यार्थी चक्क शिक्षिकेलाच प्रपोज करतो आणि तिला लग्न करण्याचा आग्रह करतो.

हेही वाचा… विद्यार्थ्यांची मारामारी होताच वर्गात धावत गेली शिक्षिका अन्…, पुढे घडलं काही भलतंच, पाहा VIRAL VIDEO

व्हायरल व्हिडीओ (Viral Video of student proposed teacher)

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत एका शिक्षिकेचा आणि विद्यार्थ्याचा व्हिडीओ कॉल सुरू आहे, ज्यात शिक्षिका ऑनलाइन क्लासद्वारे सर्व विद्यार्थ्यांना शिकवत आहे. व्हिडीओ कॉल सुरू असताना विद्यार्थी शिक्षिकेला विचारतो की, “तुमचं लग्न झालंय का?” यावर शिक्षिका उत्तर देत म्हणते, नाही. शिक्षिकेचं उत्तर ऐकताच विद्यार्थी तिला “आय लव्ह यू मॅम” असं म्हणतो.

यावर शिक्षिका उत्तर देत म्हणाली, “जर त्या उद्देशाने सांगायचं झालं तर माझं तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे”, पण शिक्षिकेच्या उत्तरावर विद्यार्थ्याने सरळ लग्नाची मागणीच घातली. विद्यार्थी म्हणाला, “तुम्ही माझ्याशी लग्न कराल का?”

व्हायरल व्हिडीओ लिंक- https://www.instagram.com/tv1indialive/reel/C_7eb9_NAPl/

हा व्हिडीओ @tv1indialive या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला तब्बल 1.8 मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… “हे फक्त कोकणी माणूसच…”, मुंबईतील दिवा स्थानकावर तरुणांनी केला बाल्या डान्स, VIRAL VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. शिक्षकांचा अनादर करून विद्यार्थी खूप लाजिरवाणं कृत्य करत आहेत, असं अनेक जण म्हणाले. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे अजिबात मजेशीर नाही, तर खूप लाजिरवाणे आहे.” तर दुसऱ्याने, “कृपया या मुलाला शिक्षा करा”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “शिक्षकाचा आदर करणं शिकलं पाहिजे.” एकाने कमेंट करत लिहिलं, “यात शिक्षिकेचा चेहरा दाखवण्यापेक्षा विद्यार्थ्याचा चेहरा दाखवायला हवा होता.”

हेही वाचा… आजीबाईंची फुगडी कमाल! बाप्पासमोर आजीने दणक्यात घातली फुगडी, कोकणातील ‘हा’ VIRAL VIDEO पाहून व्हाल अवाक

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student proposed teacher during online class said will you marry me viral video on social media dvr