Marksheet Discrepancy in Gujarat: परिक्षेत पेपरमध्ये जशा विद्यार्थ्यांकडून चुका होतात तशाच चुका शिक्षकांकडूनही पेपर तपासताना होतात का? असं झालं तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर होईल. मात्र असंच एक प्रकरण गुजरातमधून समोर आलं आहे. यामध्ये प्राथमिक शाळेच्या निकालात मास्तरांचा प्रताप पाहायला मिळाला आहे. गुजरात राज्यातील दाहोद जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळेतील वार्षिक परिक्षा निकालात झालेल्या त्रुटींमुळे वाद निर्माण झाला असून शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वंशीबेन मनीषभाई या चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला तिची गुणपत्रिका मिळाली तेव्हा केवळ विद्यार्थिनीच नव्हे तर तिच्या मित्र-मैत्रिणींसह कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण, शाळेतील ढिसाळ कारभाराचा प्रताप म्हणून विद्यार्थिनिला भाषा विषयात चक्क २०० पैकी २११ गुण आणि गणित विषयातही २०० पैकी २१२ गुण प्राप्त झाले होते. घडला प्रकार लक्षात येताच विद्यार्थी गोंधळून तर शाळा प्रशासन भांबावून गेले. गुजरातमधील शालेय विभागाच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीची पावती असणारे हे गुणपत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा