अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपटाची क्रेझ कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटातील डायलॉग्स आणि गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. लोकांवर या डायलॉग्स आणि गाण्यांची अशी जादू आहे की नेटकरी त्यांच्यावर अनेक रिल्स बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. इतकेच नाही तर, लग्न पार्टी यासारख्या समारंभांमध्ये कित्येकजण ‘पुष्पा’मधील श्रीवल्ली गाण्यावर डान्स करताना दिसतात. पण सध्या अशी एक गोष्ट घडली आहे की जी ऐकल्यावर तुम्हाला हसू आवरणार नाही.
दहावीच्या मुलाने असे काही केले आहे, जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या पठ्ठ्याने दहावीच्या उत्तरपत्रिकेत लिहले – “पुष्पा… पुष्पाराज… अपुन लिखेगा नहीं.” सोशल मीडियावरून मिळालेल्या बातम्यांनुसार, हे प्रकरण पश्चिम बंगालचे आहे. तथापि, या प्रकरणाची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. सोशल मीडियावर उत्तरपत्रिकेच्या जो फोटो व्हायरल होत आहे, त्यामध्ये मोठ्या अक्षरात लिहले आहे – “पुष्पा… पुष्पाराज… अपुन लिखेगा नहीं.”
Viral Video: महिला जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थींनीसोबत केलेला ‘नगाडा बजा’वरील डान्स पाहून सारेच थक्क
Puzzle: सोफ्यावर बसल्या आहेत सहा मुली पण, दिसत आहेत पायांच्या फक्त पाच जोड्या; सहाव्या मुलीचे पाय गेले कुठे?
नेटकरी या मुलाची कामगिरी पाहून हैराण झाले आहेत. तुम्ही विचार करू शकता की अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाची क्रेझ इतकी आहे की लोक त्यांच्या खऱ्या आयुष्यातही या चित्रपटाचे डायलॉग्स फॉलो करत आहेत. विशेषतः लहान मुलांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. सोशल मीडियावर आपल्याला पुष्पा चित्रपटाशी संबंधित लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील.