सोशल मीडियावर उत्तरपत्रिकेत चुकीच्या गोष्टी लिहिण्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत, ज्यांना पाहून लोक आजही धमाल करत आहेत. परीक्षेत प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी विचित्र गोष्टी लिहिल्या, अशा अनेक फोटो व्हायरल होत असतात. अशीच एक हटके उत्तरपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका विद्यार्थ्याने प्रश्नाचं उत्तर आठवत नसल्याने त्याच्या उत्तरपत्रिकेत प्रेमकथा लिहिली आहे. या पठ्ठ्याने थेट शायरीच लिहिली, इतकंच नाही तर मोठमोठ्या अक्षरात त्याने I LOVE MY POOJA असंही लिहिलं आणि ही परीक्षेची कॉपी सोशल मीडियावर व्हायरल होत असून आता चर्चेचा विषय बनली आहे.
पठ्ठ्याने नेमकं केले काय ?
उत्तर प्रदेशाच इंटरमिडिएट परीक्षेतला हा प्रकार असून या विद्यार्थ्याने रसायनशास्त्राच्या उत्तरपत्रिकेत उत्तराऐवजी थेट शायरी लिहिली आहे. हा विद्यार्थी आय लव्ह यू लिहून थांबेल असं कसं होईल, या पठ्ठ्याने पुढे जात शायरीदेखील लिहिली आहे. ज्यात तो म्हणतो की, ‘ये मोहब्बत भी क्या चीज है, न जीने देती है न मरने देती है. ये दुआ करो, वो न मिले तो मैं मर ही जाऊं.’ हे लिहीत त्याने शेवटी शिक्षकांची माफी मागणारं वाक्य लिहिलंय. या प्रेमप्रकरणामुळे अभ्यास होऊ शकला नाही, शालेय जीवनात खूप अभ्यास केला, सर हे लिहिण्यासाठी मला माफ करा, असंही त्याने शेवटी लिहिलंय. सोशल मीडियावर व्हायरल हे प्रकरण चांंगलच व्हायरल होऊ लागलं आहे.
(आणखी वाचा : या चोराची कमालच! महिलांची फक्त ‘ही’ वस्तू करत होता चोरी; सोशल मीडियावर वेड्या चोराची होतेय जोरदार चर्चा )
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांनी जेव्हा ही उत्तरपत्रिका पाहिली, तेव्हा त्यांनी त्यावर लाल रंगाच्या पेनाने रेघोटे मारले. त्यानंतर त्याचा फोटो काढला. आता ही उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तरपत्रिकेसोबत जोडल्या शंभरच्या नोटा
असाच आणखी एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका विद्यार्थ्याने चांगले मार्क्स मिळावेत पेपरच्या मधोमध १००-१०० च्या दोन-तीन नोटा टाकल्या आहेत. एका विद्यार्थ्याने शिक्षकासाठी शंभरच्या नोटा ठेवल्या आणि परीक्षेत पास व्हावे, म्हणून शिक्षकाला लाच देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याला आपण पास होऊ शकणार नाही, असे वाटल्याने त्याने शिक्षकांना पैसे देऊन पास होण्याची विनंती केली. मात्र, शिक्षकाने त्याचा फोटो क्लिक केला आणि तो आता व्हायरल झाला आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थी असे कृत्य करतात आणि नंतर व्हायरल होतात.